PC-X

Pakistani-Origin Cricketer Junaid Khan Dies: पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू जुनैद जफर खान याचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजताच्या सुमारास अॅडलेडमधील कॉनकॉर्डिया कॉलेज येथे घडली. ज्यात त्याचा मृत्यू मैदानावरच झाला होता. पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू जुनैद जफर खानचा क्रिकेट मैदानावरच अति उष्णतेमुळे दुःखद मृत्यू झाला. मिळालेल्या वृत्तानुसार, शनिवारी 41.7 अंश तापमानात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यादरम्यान जुनैद मैदानावर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

रमजानच्या पवित्र महिन्यात जुनैद खान पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास करत होता. त्याच्या सहकाऱ्याने सांगितले की तो दिवसभर पाणी पित होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता त्याची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली होती.कॉनकॉर्डिया कॉलेज ओव्हल येथे प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्स विरुद्ध ओल्ड कॉनकॉर्डियन्स संघांतील सामन्यात खेळत होता. जुनैद खान 2013 मध्ये पाकिस्तानहून टेक उद्योगात काम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता.

ऑस्ट्रेलियात झालेला दुसरा मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी फिलीप ह्युजचाही मैदानात मृत्यू झाला होता. पण तो चेंडू लागून झाला होता. पण या पाकिस्तानी खेळाडूचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे.