एशिया कप 2018 : बांग्लादेशकडून पराभूत झाल्यावर पाकिस्तानी संघ 'त्या' फॅन गर्लवरून ट्रोल
एशिया कप 2018 Photo Credit Twitter

यंदा एशिया कप 2018 चे सामने केवळ मैदानावरील चुरस पाहण्यासाठी नव्हे तर स्टेडियममधील एक खास व्यक्ती पाहण्यासाठीही चर्चेचा विषय बनली आहे. यंदा एका पाकिस्तानी फॅन तरूणीने सोशल मीडियावरील नेटकर्‍यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारत पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यात ही पाकिस्तानी बाला अनेकदा चर्चेत असते. मात्र काल पाकिस्तानवर बांग्लादेशच्या संघाने मात केल्यानंतरही ही मुलगी आणि पाकिस्तानचा संघ ट्रोल झाला आहे.   एशिया कप 2018 : क्रिकेट चाहत्यांना वेड लावणारी 'ती' पाकिस्तानी तरूणी नेमकी कोण ?

सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर पाकिस्तानचा खेळ पाहून या संघापेक्षा कॅमरामॅनचा परफॉर्मन्स चांगला असल्याचं म्हटलं जात आहे. पहा सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ?

पाकिस्तान संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ही मुलगी स्टेडियममध्ये हमखास हजर असते. या मुलीचे जगभरात सोशल मीडीयात असंख्य चाहते आहेत.

मुशफिकुर रहीम आणि मोहम्मद मिथुन या दोन खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे बांग्लादेशने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. बांग्लादेशने पाकिस्तानसमोर 240 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र पाकचा संघ 202 धावांवरच गुंडाळण्यात बांग्लादेशला यश मिळालं.