Pakistan Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team 19th Match 2024 ICC Womens T20 World Cup: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 19 वा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ)महिला संघात आज 14 ऑक्टोबर रोजी होत आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जात आहे. टी-20 विश्वचषकात (ICC Women's T20 World Cup 2024)पाकिस्तान संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. ज्यामध्ये एकात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी, पाकिस्तान संघला न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 मध्ये विजयाची नोंद झाली आहे. तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला पाकिस्तानविरुद्ध तिसरा विजय नोंदवायचा आहे. (हेही वाचा:Pakistan Women vs New Zealand Women T20 Head To Head: पाकिस्तान-न्यूझीलंड संघात होणार चुरशाची सामना, येथे हेड टू हेड आकडेवारी पहा )
दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी
पाकिस्तान आणि न्यूझीलंड महिला संघ 11 वेळा टी 20 मध्ये खेळले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा आहे. न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला केवळ दोन सामन्यात विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत टी-20 मध्ये तिसरा विजय नोंदवण्याच्या इराद्याने पाकिस्तानचा संघ आज न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
या खेळाडूंवर नजर असेल
अमेलिया केर: पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा न्यूझीलंडच्या अमेलिया केरवर असतील. अमेलिया केर ही न्यूझीलंड संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. जी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींमध्ये चांगली कमगिरी करू शकते. या अष्टपैलू खेळाडूने टी 20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 3 सामन्यात 66 धावा आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत.
सोफी डिव्हाईन: न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन पाकिस्तानविरुद्ध मोठी इनिंग खेळू शकते. याशिवाय गरज पडल्यास ती गोलंदाजीतही योगदान देऊ शकते. अशा स्थितीत पुन्हा सर्वांच्या नजरा सोफी डिव्हाईनवर खिळल्या आहेत.
निदा डार: पाकिस्तानची अनुभवी अष्टपैलू खेळाडू निदा डारची कामगिरी टी-20 विश्वचषकात संमिश्र पहायला मिळाली आहे. मात्र, न्यूझीलंडच्या निदा दारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. निदा दार बॉल आणि बॅट दोन्हींमध्ये चमत्कार करू शकते.
याशिवाय, दोन्ही संघांकडे अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत. जे आपल्या कामगिरीने सामन्याचा मार्ग बदलू शकतात. ज्यामध्ये सुजी बेट्स, मॅडी ग्रीन रोजमेरी मायर, मुनिबा अली आणि फातिमा सना आहेत. या खेळाडूंवरही सर्वांच्या नजरा असतील.
दोन्ही संघांचे खेळाडू
पाकिस्तान महिला संघ: मुनिबा अली (विकेटकीपर/कर्णधार), सिद्रा अमीन, सदफ शमास/इरम जावेद, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, ओमामा सोहेल, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह.
न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, इसाबेला गेज (विकेटकीपर), ली ताहुहू, लेह कास्परेक, रोझमेरी मायर, ईडन कार्सन.