![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/3-907040348.jpg?width=380&height=214)
Pakistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team 3rd ODI 2025 Tri-Series Live Streaming: पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan vs South Africa 3rd ODI 2025) यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. तिरंगी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला होता. (IND vs ENG 2025, Narendra Modi Stadium Pitch Stats & Records: भारत आणि इंग्लंडमधील शेवटच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी, नरेंद्र मोदी स्टेडियमवरचे खेळपट्टीचे रेकॉर्ड, सर्वाधिक धावा, विकेट्स आणि इतर महत्त्वाची आकडेवारी घ्या जाणून)
पाकिस्तान तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवेल. दुसरीकडे, तिरंगी मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडने 6 गडी राखून पराभव केला. आता तिसरा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा असेल कारण तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कुठे पाहायचा?
भारतातील टीव्हीवर पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर केले जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह अॅप, फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.