Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 3rd Test 2024 Live Streaming: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवार, 24 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये हा सामना होणार आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. इंग्लंडने पहिली कसोटी एक डाव आणि 47 धावांनी जिंकली होती. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत यजमान संघाच्या नजरा तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवून मालिका जिंकण्यावर असतील. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल आणि पाकिस्तानला पराभूत करून मालिकेवर कब्जा करायचा असेल. तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग 11 जाहीर केले आहेत. तिसरा कसोटी सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा - Pakistan vs England 3rd Test: खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त बनवण्यासाठी पाकिस्तानचा 'हा' अजब जुगाड; फोटो व्हायरल )
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता खेळवला जाईल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा
आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, FanCode ॲप आणि वेबसाइटवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून तिसऱ्या कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल.
तिसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघाचे प्लेइंग 11
इंग्लंडचे प्लेइंग 11: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स स्मिथ, गस ऍटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच आणि शोएब बशीर
पाकिस्तानचे संभाव्य प्लेइंग 11: सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, झाहिद महमूद