Photo Credit - Twitter

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 3rd Test 2024:   पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे आणि मालिकेतील निर्णायक सामना आता 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने पहिली कसोटी एक डाव आणि 47 धावांनी जिंकली होती. मात्र, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला. आता तिसरी कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तान संघ करत आहे. या ठिकाणी खेळपट्टी कोरडी करण्यासाठी मोठे पंखे आणि बाहेरील हीटर्सचा वापर केला जात आहे. रावपिंडीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. यासाठीच हे करत असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा  -  Pakistan Beat England 2nd Match Scorecard: पाकिस्तानची पराभवाची मालिका अखेर संपुष्टात, मुलतान कसोटी 152 धावांनी जिंकली; इंग्लंड144 धावांवर गारद )

पाहा पोस्ट -

दरम्यान, तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने 11 जणांची घोषणा केली आहे. इंग्लिश संघाने आपल्या संघात तीन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. जॅक लीच आणि शोएब बशीरसह रेहान अहमदला तिसऱ्या कसोटीत संधी मिळाली आहे. याशिवाय गस ऍटकिन्सनचे पुनरागमन झाले आहे.

रावळपिंडीची खेळपट्टी सामान्यतः सपाट मानली जाते. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना फार कमी मदत मिळते. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघ पूर्ण तयारीनिशी या खेळपट्टीला टर्निंग ट्रॅक बनवण्याचा प्रयत्न हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून होत आहे. यासाठी या मोठ्या फॅनचा वापर हा केला जात असल्याचे दिसून येत आहे.