New Zealand National Cricket Team vs Pakistan National Cricket Team Match Scorecard: चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 115 धावांनी पराभव केला. टिम सेफर्ट (44) आणि फिन अॅलन (50) यांच्या शानदार सुरुवातीनंतर, कर्णधार मायकेल ब्रेसवेलने 46 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पाकिस्तानसमोर विजयासाठी 221 धावांचे लक्ष्य होते पण संपूर्ण संघ 105 धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडने 115 धावांनी मोठा विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी निर्विवाद आघाडी घेतली.

पाकिस्तानचा कर्णधार आगा सलमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी न्यूझीलंडला धमाकेदार सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 4 षटकांत 59 धावा जोडल्या. सेफर्टने 22 चेंडूंत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. फिन ऍलनने 20 चेंडूत 50 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये त्याने 3 षटकार आणि 6 चौकार मारले.

मार्क चॅपमनने 16 चेंडूत 20 धावा आणि डॅरिल मिशेलने 23 चेंडूत 29 धावा करून मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटी, कर्णधार मायकेल ब्रेसवेलने 26 चेंडूत 46 धावांची जलद खेळी केली. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 5 चौकार मारले. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 221 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते.

पाकिस्तानची फलंदाजी कोसळली

पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. सलामीवीर मोहम्मद हरिस (2) आणि हसन जवाज (2) अपयशी ठरले. कर्णधार सलमान अली आगा देखील 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शादाब खान (1) आणि खुशदिल शाह (6) यांनीही निराशा केली. संघाकडून अब्दुल समदने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 30 चेंडूत 44 धावा केल्या.