पाकिस्तान संघाचा कर्णधार Babar Azam आपल्या चुलत बहिणीशी बांधणार लग्नगाठ, पुढील वर्षी पार पडणार विवाहसोहळा- रिपोर्ट
बाबर आजम (Photo Credit: Getty)

Babar Azam Wedding: आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात अनेक फलंदाजी विक्रम आपल्या नावावर केल्यावर आणि नंतर कर्णधार म्हणून पाकिस्तान क्रिकेट संघात (Pakistan Cricket Team) आपले स्थान निश्चित केल्यानांतर बाबर आजम (Babar Azam) पुढील वर्षी आपल्या आयुष्यात नवा अध्याय सुरु करणारा आहे. बाबर आपल्या चुलत बहिणीशी लग्न करणार असल्याचे पाकिस्तानी मीडियाच्या वृत्ताने म्हटले आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांमधील वृत्तानुसार, बाबर पुढील वर्षी आपल्या मामाच्या मुलीशी लग्न करेल असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानी मीडियाच्या अहवालानुसार, दोन्ही कुटुंबांनी परस्पर चर्चा केल्यानंतर बाबरचे पुढच्या वर्षी लग्न होणार असल्याचे सामोरे आले आहे. विशेष म्हणजे ही बातमी सामोर येण्यापूर्वी त्याचा सहकारी आणि माजी कर्णधार अझर अलीने बाबरला तसा सल्ला दिला होता. ट्विटरवर प्रश्नोत्तरांच्या सत्रात चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना अलीला विचारले गेले की आपण आपल्या कर्णधाराला काही सल्ला द्याल? प्रत्युत्तरादाखल तो म्हणाला: “शादी केर ले” (लग्न करा). दरम्यान, बाबरच्या चुलत बहिणीबद्दल फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. (ICC WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे 5 सर्वात यशस्वी कर्णधार, भारतीय नव्हे ‘हा’ खेळाडू अव्वल स्थानी!)

दरम्यान, त्याच्या फलंदाजी कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत राहूनही बाबर आजमने आपल्या साखरपुड्याची बातम्या खूप गुप्त ठेवली. मात्र, Geo News उर्दूवर च्या वृत्तानुसार त्याच्या सर्व पाकिस्तानी संघातील साथीदारांनाही त्याच्या साखरपुड्याबद्दल माहित होते. सर्वांसाठी ही एक आश्चर्यकारक बातमी ठरली आहे कारण सध्या क्रिकेटपटू अबू धाबी येथे पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) दुसर्‍या अर्ध्या भागाची तयारी करत आहे. सध्या तो अबू धाबी येथे क्वारंटाईन आहे. बाबर पीएसएलमध्ये कराची किंग्जकडून खेळत असून यंदा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. पीएसएल हंगामातील उर्वरित 20 सामने 9 जूनपासून खेळण्याची शक्यता असून वेळापत्रक जाहीर होण्याची खेळाडूंना प्रतीक्षा आहे.

बाबरला पाकिस्तानचा सर्व-फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आल्यापासून तो खूप व्यस्त आहेत. संघ नजीकच्या भविष्यात काही नॉन-स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. टीम पीएसएल नंतर लवकरच 22 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. त्यांनतर ते युएई येथे इंग्लंड, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. शिवाय, टी -20 वर्ल्ड कपही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत किंवा युएई या दोन्ही देशांत खेळला जाणार आहे. एकूणच कर्णधार म्हणून बाबर आजमसाठी हे महत्त्वपूर्ण वर्ष असणार आहे.