पाकिस्तान आणि हाँगकाँग (PAK vs HK) यांच्यात आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चा 6 वा सामना आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करा किंवा मरो असा असणार आहे. शारजाह जिंकणारा संघ भारत, (IND) अफगाणिस्तान (AFG) आणि श्रीलंकेसह (SL) सुपर-4 मध्ये स्थान मिळवेल. या आवृत्तीत पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये आतापर्यंत 1-1 सामने झाले असून दोन्ही संघांना भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला तर हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव झाला. चला जाणून घेऊया पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामना कधी आणि कुठे तुम्ही पाहू शकता.
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप 2022 सामना कधी आणि कुठे पाहणार?
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग हा सामना शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 म्हणजे आज होणार आहे. आणि हा सामना शारजाह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप 2022 सामना कधी सुरू होईल?
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप 2022 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप 2022 सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप 2022 सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी चॅनेलवर प्रसारित केला जाईल. (हे देखील वाचा: SL vs BNG, Asia Cup 2022: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 2 विकेट्सने पराभव करत सुपर-4 मध्ये मिळवले स्थान)
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया चषक 2022 सामन्याचे Live Streaming कुठे पाहणार?
Hotstar वर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया चषक 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.