पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन अफरीदी मुश्किलीत, वांशिक टिप्पणी केल्याचा पत्रकारने केला आरोप
शाहीन अफरीदी (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याच्यावर वर्णद्वेषी टीकेचा आरोप करण्यात आला आहे. डेली मेलचे पत्रकार असगर अली मुबारक (Asghar Ali Mubarakयांनी पत्रकार परिषदेत आफ्रिदीने वर्णद्वेषपूर्ण भाष्य केले आणि काळ्यांबद्दल त्यांची खिल्ली उडविली असल्याचा आरोप केला आहे. कराची येथे पाकिस्तान-श्रीलंका (Sri Lanka) संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामना दरम्यान ही घटना घडली. पाकिस्तानमध्ये दहा वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सुरू झाले असले तरी तेथील क्रिकेटपटू वादातून बाहेर पडायला शिकलेले नाहीत. गुरुवारी दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकार असगरने आफ्रिदीला प्रश्न विचारला तेव्हा शाहीन म्हणाला की तुम्हीजरा स्वतःवर जरा प्रकाशात टाका म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट पाहू शकेन. यानंतर क्रिकेटपटूने आपल्या काळ्या रंगाची खिल्ली उडविली असल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. (PAK vs SL 2nd Test: बाबर आझम, अझर अली, अबिद अली आणि शान मसूद यांनी शतकं ठोकत केली भारताच्या विश्व रेकॉर्डची केली बरोबरी)

या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडिया साईट ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, यामध्ये पत्रकारासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेविषयी सांगितले. तो म्हणाले की आफ्रिदीने जे म्हटले ते वांशिक होते. असगर म्हणाले की, आफ्रिदीने आयसीसीच्या (ICC) आंतरराष्ट्रीय आचारसंहितेचा भंग केला आणि यासाठी त्यांनी जाहीरपणे माझ्याकडे माफी मागावी, जर मी दिलगिरी व्यक्त केली नाही तर मी हा मुद्दा न्यायालयात नेईन. व्हिडिओमध्ये डेली मेलच्या पत्रकाराने 1996 च्या विश्वचषकात तत्कालीन इंग्लंडचा कर्णधार मायकेल अ‍ॅथर्टनबरोबरच्या घटनेचा उल्लेखही केला होता. ते म्हणाले की मी याआधी अ‍ॅथर्टनचे प्रकरण न्यायालयात नेले होते, त्यावेळी कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला होता आणि अ‍ॅथर्टनला माफी मागावी लागली होती.

मात्र, पाकिस्तानमध्ये दहा वर्षानंतर कसोटी क्रिकेट परतला आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणत्याही संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास सहमती दर्शविली नाही. अलीकडेच श्रीलंकेने पहिली वनडे  आणि टी-20 मालिका खेळली आणि आता 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ते पुन्हा पाकिस्तान दौर्‍यावर आहे. मालिकेचा पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळला गेला.