पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचा क्रिकेट तज्ज्ञ वसीम अक्रमने (Wasim Akram) पाकिस्तान संघाचा (Pakistan Team) क्लास लावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात जो इरादा दाखवायला हवा होता, तो संघाने दाखवला नाही म्हणून त्याने पाकिस्तान संघावर सडकून टीका केली आहे. 10 षटकांत संघ हरला तरी सामना जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्याचे मत आहे. सामन्यानंतर वसीम अक्रमने ब्रॉडकास्टिंग चॅनलवर सांगितले की, “जर तुम्ही धावांचा पाठलाग करत असाल आणि दोन विकेट पडल्या तर तुम्ही 10 षटकांत हरलात, कुणालाही पर्वा नाही. मी तुला साथ देईन चाहतेही तुम्हाला साथ देतील. पाकिस्तानचे लोक तुम्हाला साथ देतील, पण तुम्ही असा खेळ केलात तर तुम्हाला कोणीही पसंत करणार नाही.
वसीम अक्रम म्हणाला, “सामने जिंकणे किंवा हरणे हा खेळाचा भाग आहे. हेही आपल्या सर्वांना कळते. हे मला मान्य आहे पण हिंमक दाखवुन पराभूत व्हा. दोन षटकात दोन गडी गमावून 10 षटकात 56 धावा किंवा 60 असा काय उपयोग. आम्ही 210 चा पाठलाग करणार आहोत. तुमची मानसिकता काय आहे हा या सामन्याचा मुद्दा आहे. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी सामनाधिकारी आणि पंचांची घोषणा, 'या' भारतीयाला मिळाली जागा)
वसीम पुढे म्हणाला, "जर मी बाबर असतो तर मी प्रशिक्षकाला सांगितले असते आणि एकतर 12 षटकांत सर्वबाद होण्याचा संदेश दिला असता किंवा सामना जिंकण्याचा प्रयत्न करा. हीच सर्वात मोठी समस्या आहे." गेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ खराबपणे पराभूत झाला.