पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामना खेळवला जाणार होता पंरतू पहिल्या दिवशी पावसाने खेळ केला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरु होईल. कालचा दिवस पावसाने वाया गेल्याने आज सकाळी या सामन्याला सुरुवात झाली असून आहे. (हेही वाचा - Pakistan vs Bangladesh 2nd Test Match: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेशमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाचा खेळ; पहिल्या दिवसाचा खेळ रद्द)
पाहा पोस्ट -
🚨 TOSS ALERT 🚨
Bangladesh win the toss and opt to bowl first in the second Test 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/43sSJda7Vb
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 31, 2024
पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. या मालिकेत बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने मोठी मेहनत घेतली असून हा सामना हरल्यास किंवा अनिर्णीत राहिल्यास बांगलादेश मालिका विजय प्राप्त करेल. बांगलादेशचा हा पहिला पाकिस्तानविरुद्धचा मालिका विजय असणार आहे.
पाहा पोस्ट -
Bangladesh Tour of Pakistan 2024
Bangladesh Playing XI | 2nd Test#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/qKghCviWCN
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 31, 2024
पाहा दोन्ही संघाची प्लेईंग XI
पाकिस्तानची प्लेईंग XI - अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मोहम्मद अली, मीर हमजा
बांगलादेशची प्लेईंग XI - बीशदम इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकिपर), शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा