PAK vs BAN 1st Test 2020 Live Streaming: पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश टेस्ट लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Sony ESPN आणि SonyLIV वर
बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुल हक आणि पाकिस्तानचा कर्णधार अझर अली (Photo Credit: Twitter / Pakistan Cricket)

आयसीसी (ICC) कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतर्गत पाकिस्तान (Pakistan) दौर्‍यावर असलेला बांग्लादेशी (Bangladesh) संघ पहिला कसोटी सामना करण्यास सज्ज आहे. मालिकेचा पहिला सामना शुक्रवार, 7 फेब्रुवारीपासून रावळपिंडीमध्ये सुरु होणार आहे. दोन्ही देशांमधील मालिकेचा दुसरा सामना एप्रिलमध्ये खेळला जाईल. या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये एक वनडे सामनादेखील खेळला जाणार आहे. पहिला कसोटी सामना रावळपिंडी (Rawalpindi) क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. 7 ते 11 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या सामन्यात बांग्लादेशसमोर पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी कडवे आव्हान असेल. दरम्यान, पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेपूर्वी बांग्लादेशला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. संघाचा मुख्य खेळाडू अनुभवी यष्टिरक्षक मुशफिकुर रहीमने दौर्‍यावर जाण्यास नकार दिला. त्याच्यासह काही कोचिंग स्टाफनेही त्याला माघार घेतली.

पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील पहिला टेस्ट सामन्याचे भारतात थेट प्रसारण सोनी नेटवर्कवर उपलब्ध असेल. हा सामना भारतात सोनी ईएसपीएन (Sony ESPN) आणि सोनी ईएसपीएन एचडी (ESPN HD) चॅनेल्सवर लाईव्ह उपलब्ध असेल. सामना सकाळी साडेदहा (10:30) वाजता सुरु होईल. आणि या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी एलआयव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहायला मिळेल.

बऱ्याच काळानंतर पाकिस्तान दौर्‍यावर आलेल्या बांग्लादेशला नुकत्याच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला. आणि आता ते टेस्ट मालिकेत पाकिस्तानला चांगली झुंज देण्याच्या प्रयत्नात असेल. यापूर्वी 2003 मध्ये बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध एक कसोटी मालिका खेळली होती ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

पहिल्या टेस्ट सामन्यासाठी असा आहे पाकिस्तान-बांग्लादेश संघ

पाकिस्तान: अजहर अली (कॅप्टन), आबिद अली, अशद शफीक, बाबर आजम, बिलाल आसिफ, फहीम अशरफ, फवाद आलम, हारिस सोहैल, इमाम उल हक, इमरान खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, शाहीन अफरीदी, शान मसूद आणि यासिर शाह.

बांग्लादेश: मोमिनुल हक, (कॅप्टन), तमीम इकबाल, सैफ हसन, नजमुल हुसैन, महमदुल्लाह, मोहम्मद मिथुन, लिटन दास, तइजुल इस्लाम, नयीम हसन, इबादत हुसैन, अबु जायेद राही, अल अमीन हुसैन, रुबेल हुसैन और सौम्य सरकार।