सलामी फलंदाज के एल राहुल ठरला अपयशी; अगामी कसोटी सामन्यात रोहीत शर्माला संधी
k L Rahul And Rohit Sharma (Getty Images)

भारतीय क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज के एल राहुल (K L Rahul) याने निराशाजनक खेळी केल्यानंतर अगामी कसोटी सामन्यात (Test Match) रोहीत शर्माला (Rohit Sharma) संधी देण्यात आली आहे. गेल्या कित्येक सामन्यांपासून केएल राहुल हा भारतीय संघासाठी सलामी फलंदाजी करत होता. के एल राहुलला अनेक सामन्यात संधी देऊनही तो अपयशी ठरली आहे. वेस्टइंडीज ( West Indies) दौऱ्यातही के एल राहुल याला संधी दिली होती. परंतु, या दरम्यान त्याला चांगली कामगिरी बजावता आली नाही. त्याने 4 सामन्यात केवळ 101 धावा करु शकला आहे. यामुळे केएल राहुलच्या जागेवर तडाखेबाज रोहीत शर्मा याला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघाचे मुख्य संघ निवडक एमके प्रसाद (M K Prasad) यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. "अगामी कसोटी सामन्यात रोहीत शर्माची सलामी फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. के एल राहुलला मागच्या १२ सामन्यात केवळ एक अर्धशतक करता आले आहे". राहुलच्या निराशाजनक प्रदर्शन केल्यानंतर रोहीत शर्माची निवड करण्यात यावी, अशी सौरव गांगुली (Sourav Gangully) आणि व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी संघ निवडक यांच्याकडे विनंती केली होती. हे देखील वाचा-पाकिस्तानाला आणखी एक मोठा झटका, लसिथ मलिंगा, अॅंजिलो मॅथ्यू, तिशारा परेरा यांच्यासह श्रीलंकेच्या 'या' खेळांडूनी खेळण्यास दिला नकार

एमएसके प्रसाद यांनी एका वृताला दिलेल्या माहितीनुसार, अगामी कसोटी सामन्यात रोहीत शर्मा यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. केएल राहुल यांच्या समर्थनात म्हणाले की, केएल राहुल हा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. परंतु सध्या केएल राहुल गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरत आहे. माहितीनुसार, अगामी दक्षिण अफ्रिका यांच्याविरोधातील कसोटी सामन्यात रोहीत शर्मा याला सलामी फलंदाज म्हणून संधी देण्याची, शक्यता दर्शवली जात आहे. मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) यालाही सलामी फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती. परंतु मयंक यालाही चांगली कामगिरी करता आली नाही.