भारत-श्रीलंका आशिया कप फायनल 1995 (Photo Credit: Twitter/ICC)

आशिया चषक (Asia Cup) क्रिकेट स्पर्धेत भारताचे वर्चस्व कायम आहे. भारताने आजवर सर्वाधिक सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. दरम्यान 2016 मध्ये ही टी-20 स्पर्धा म्हणून आयोजित करण्यात आली होती. पुढचा एशिया कप यावर्षी सप्टेंबरमध्ये खेळला जाणार आहे, परंतु कोविड-19 मुळे त्याबाबत अनिश्चितता आहे. आजपासून 25 वर्षांपूर्वी शारज्यात भारताने सलग चौथ्यांदा आशिया चषक जिंकला. आजच्या दिवशी (14 एप्रिल 1995) मोहम्मद अझरुद्दीनच्या (Mohammad Azharuddin) नेतृत्वात भारताने (India) फायनलमध्ये श्रीलंकेला (Sri Lanka) 8 विकेटने पराभूत करून पुन्हा एकदा आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. तत्पूर्वी, भारताने 1984 मध्ये आयोजित पहिल्या आशिया चषक जिंकल्यावर 1998 आणि नंतर 1990/91 मधील आयोजित टूर्नामेंट जिंकली होती. तथापि, 1986 मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या स्पर्धेत भारताने भाग घेतला नव्हता.  श्रीलंकाबरोबर क्रिकेटमधील ताणतणावाच्या संबंधांमुळे भारताने नाव मागे घेतले आणि त्याऐवजी बांग्लादेशने भाग घेतला होता. (On This Day: 36 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पाकिस्तानचा पराभव करत भारताने पहिल्यांदा जिंकले होते एशिया कप)

यानंतर आयोजित आशिया चषक स्पर्धेत शंभर टक्के विक्रम नोंदविणार्‍या भारतीय संघानेही 1995 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकाने 7 बाद 230 धावा केल्या होत्या. शारजाहमध्ये हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने 49 चेंडू शिल्लक आणि 2 विकेट गमावून हे लक्ष्य अत्यंत सहजतेने प्राप्त केले आणि पुन्हा एकदा आशियाई चषकचे जेतेपद जिंकले.

भारताचे नेतृत्व मोहम्मद अझरुद्दीन, तर श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगा यांनी केले होते.अंतिम सामन्यात कर्णधार अझरुद्दीन आणि नवजोत सिंह सिद्धू यांनी तिसर्‍या विकेटसाठी 175 धावांची मजबूत भागीदारी केली. सिद्धूने 84 धावा केल्या. याआधी सचिन तेंडुलकरने 41 चेंडूत 41 धावा फटकावल्या, तर मनोज प्रभाकरने 9 धावांवर स्वस्तात विकेट गमावली. अझरने 89 चेंडूत 90 धावांची जोरदार खेळी केली, ज्यात त्याचे दोन षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. अझरुद्दीन सामनावीर ठरला तर सिद्धूला मॅन ऑफ थे सिरीज म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या स्पर्धेत 98.50 च्या सरासरीने 197 धावा केल्या. सचिनने या स्पर्धेत 68.33 च्या सरासरीने 205 धावा केल्या.