Virat Kohli Test Debut in 2014: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू विराट कहोलीने (Virat Kohli) 2014 मध्ये कसोटी स्वरूपात कर्णधार म्हणून पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीने प्रथमच नेतृत्व केले होते. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना अॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) मैदानावर खेळला गेला होता. कसोटी सामन्यात विराट कोहलीने कर्णधार म्हणून पदार्पण केले असले तरी भारतीय संघाला (Indian Team) सामन्यात 48 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 364 धावांचे लक्ष्य दिले होते. मुरली विजय 99 धावांवर शानदार फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनच्या फिरकीपढे ढेर झाला . त्यानंतर लायन एकापाठोपाठ एक भारतीय फलंदाज बाद करत राहिला आणि ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना 48 धावांनी जिंकला. (IND vs AUS 2020-21: SCG वर विराट कोहलीची 'ही' चूक टीम इंडियाला पडली महागात, टीम इंडिया कॅप्टननेही दिली कबुली)
अर्थात त्याच्या नेतृत्वात कोहली पहिला कसोटी सामना जिंकू शकला नाही परंतु त्याने सामन्यात प्रभावी फलंदाजी केली आणि दोन्ही डावात शतक झळकावले. अखेरीस टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-0 ने मालिका गमवावी लागली. विशेष म्हणजे या दौर्यावर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 2014 पासून विराटने 55 सामन्यात कर्णधार म्हणून नेतृत्व केले असून धोनीची बरोबरी करण्यापासून ते फक्त पाच सामने दूर आहे. या फॉरमॅटमध्ये धोनीने कर्णधार म्हणून संवर्धिक 60 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. याशिवाय कोहली कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला आहे.
कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 33 कसोटी सामने जिंकले आहेत. कोहली हा एकमेव कर्णधार आहे ज्याने त्याच्या नेतृत्वात 33 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. सध्या कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. या दौर्यावर टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वात तीन वनडे सामने आणि तितकेच टी-20 सामने खेळले आहेत. आणि आता 17 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. पहिला सामना अॅडिलेडमध्ये खेळला जाणार असून तो दिवस/रात्र सामना असेल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा पिंक बॉल कसोटी सामना खेळणार आहे.