सौरव गांगुली-राहुल द्रविड 199 वर्ल्ड कप भागीदारी (Photo Credit: Twitter/ICC)

On This Day in 1999: एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 पेक्षा अधिक धावा करणारा सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी अनेकदा मैदानावरील विरोधी संघांना लोळवले आहे. 22 वर्षांपूर्वी 1999 च्या विश्वचषकात गांगुली आणि द्रविडने श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टॉन्टनच्या (Taunton) मैदानावर दुसर्‍या विकेटसाठी विक्रमी 318 धावांची भागीदारी केली होती. त्या काळी एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील कोणत्याही विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी होती. या वर्ल्ड कपच्या ग्रुप (World Cup) टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विरोधात पराभव पत्करावा लागला होता. तिसर्‍या सामन्यात भारतापुढे अर्जुन रणतुंगाच्या (Arjuna Ranatunga) नेतृत्वातील श्रीलंकेचे आव्हान होते. श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात चांगली नव्हती. पहिल्याच ओव्हरमध्ये सद्गोपन रमेश 5 धावांवर बाद झाला. यानंतर गांगुलीचा साठी देण्यासाठी राहुल द्रविड मैदानावर उतरला. (India Tour of Sri Lanka 2021: भारताला Rahul Dravid यांनी बनवले आहे वर्ल्ड चॅम्पियन, या गुणांमुळे BCCI ‘सुपरहिट’ प्रशिक्षकावर लावू शकते दाव)

गांगुलीने 158 चेंडूत 17 चौकार आणि 7 शतकारांच्या मदतीने 183 धावांची खेळी केली जी वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. दुसरीकडे राहुल द्रविड 129 चेंडूत 145 धावांवर बाद झाला. द्रविड आणि गांगुलीने वनडे क्रिकेटमधील पहिली 300 धावांची भागीदारी रचली आणि केवळ 44.5 षटकांत 318 धावा काढल्या. भारताने वर्ल्ड कपमध्ये तेव्हा तब्बल 373 धावसंख्येची नोंद केली आणि श्रीलंकेचा डाव 216 धावांवर संपुष्टात आल्याने 157 धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. यादरम्यान, भारतकाऊं द्रविडने आक्रमक भूमिका घेतली आणि वेळोवेळी चौकार खेचत विरोधी संघावर दबाव आणला. ब्रिस्टलमध्ये केनियाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर 1999 विश्वचषकात भारताच्या नंबर- 3 स्टार फलंदाजाने त्याचे सलग दुसरे शतक ठोकले होते. गांगुली आणि द्रविडने दुसर्‍या विकेटसाठी विक्रमी 318 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, भारत सहजतेने सामना जिंकला आणि गटातील टप्प्यात 5 पैकी 5 विजयांसह अपराजित राहिला. तथापि, सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांचे 1999 वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तथापि, गांगुली आणि द्रविडचा हा विश्वविक्रम फार काळ टिकू शकला नाही. सहाच महिन्यांनंतरच द्रविडने हैदराबाद येथे सचिन तेंडुलकरच्या साथीने न्यूझीलंडविरुद्ध 331 धावा जोडून विक्रम मोडला.