Anil Kumble's Perfect 10: भारतीय क्रिकेट इतिहासात 7 फेब्रुवारीचा दिवस खूप खास आहे. 1999 मध्ये आजच्याच दिवशी भारताचे माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी दिल्ली (Delhi) येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळलेल्या कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व 10 विकेट घेण्याचा कारनामा केला होता. जिम लेकर (Jim Laker) यांच्यानंतर कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 विकेट घेणारा कुंबळे (Kumble 10 Wickets) जगातील फक्त दुसरा गोलंदाज ठरला होता. या दोन्ही महान खेळाडूंना वगळता आजवर कोणताही गोलंदाज त्यांच्या या खेळीची पुनरावृत्ती करू शकलेला नाही. एकट्या कुंबळेने पाकिस्तानला 74 धावा देत 10 गडी बाद केले होता मात्र, सर्व विकेट्स 18.2 ओव्हरमध्ये 37 धावांच्या अंतराने पडल्या. टीम इंडियासाठी (Team India) पाकिस्तानविरुद्ध हा विजय खूप महत्वाचा होता कारण 23 कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर पहिला विजय मिळवला होता. (On This Day in 2006: इरफान पठाणने आजच्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेत रचला होता इतिहास, अजूनही आहे अबाधित)
कुंबळेने पाकिस्तानच्या डावाच्या दहा डावांत दहा विकेट्स घेऊन केवळ इतिहास रचला नाही तर देशाला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवून पाकिस्तानविरूद्ध अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममधील सामन्याच्या चौथ्या दिवशी 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने मजबूत सुरुवात करत एकही विकेट न गमावता 100 धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा पराभव निश्चित दिसत असताना कुंबळे सामन्याचे चित्रच बदलले. कुंबळेने पहिली विकेट घेतली आणि त्यानंतर त्याला रोखणे अशक्यच झाले. दिल्ली टेस्ट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात फक्त 252 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान पहिल्या डावात केवळ 172 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि यजमान संघाला 80 धावंची आघाडी मिळाली. टीम इंडियाचा दुसरा डाव 339 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानला 420 धावांचे लक्ष्य मिळाले.भारताने चेन्नई येथील पहिली कसोटी अवघ्या 12 धावांनी गमावली होती आणि दिल्ली कसोटीत त्यांना विजय गरजेचा होता.
#OnThisDay in 1999, #TeamIndia spin legend @anilkumble1074 became the first Indian bowler and second overall to scalp all the 10 wickets in a Test innings. 👏👏
Watch that fantastic bowling display 🎥👇 pic.twitter.com/OvanaqP4nU
— BCCI (@BCCI) February 7, 2021
भारताकडून दुसऱ्या डावात सदागोप्पन रमेशने 96 तर सौरव गांगुलीने नाबाद 62 धावा केल्या. 'जंबो' म्हणून ओळखल्या जाणारे कुंबळे नियमित अंतराने विकेट घेत राहिले आणि 61व्या ओव्हरमध्ये वासिम अकरमला बाद करत इतिहास रचला. कुंबळेने 26.3 ओव्हरमध्ये 74 धावा देत 10 विकेट घेतल्या आणि भारताला 212 धावांनी प्रसिद्ध विजय मिळवून दिला. भारतीय फिरकीपटूने 132 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 619 विकेट घेत 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्ननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहे.