एहसान मनी, सौरव गांगुली (Photo Credit: Getty/IANS)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या आठवड्याच्या सुरूवातीस ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणारी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा अधिकृतपणे पुढे ढकलली. या निर्णयाचे मुख्य कारण कोविड-19 असल्याचे सांगितले परंतु अनेकांना असे वाटले की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आयसीसीने भारतातील 2023 वनडे विश्वचषक (ODI World Cuo) स्पर्धेच्या विंडोचे वेळापत्रक बदलले. यापूर्वी वनडे वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्च विंडोमध्ये होणार होता. मात्र, अहवालांनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख एहसान मनी (Ehsan Mani) यांनी बैठकीच्या आधी पाकिस्तान सुपर लीग (PSL) साठीची विडो निश्चित केली. 2023 विश्वचषक स्पर्धा आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असून अंतिम सामना 26 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. विशेष म्हणजे, पीएसएलसाठी पुढील तीन वर्षांसाठी विंडो मंजूर झाली असून आयसीसीचे सर्व तीन कार्यक्रम वर्षाच्या उत्तरार्धात होणार आहेत. (आयसीसीच्या पुढील तीन विश्वचषक स्पर्धेच्या तारखेत बदल; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक)

तसेच, आता पुढील तीन वर्षांसाठी फेब्रुवारी-मार्चमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका निर्धारित केली जात नाही. “याचा अर्थ असा की आता फेब्रुवारी-मार्चमधील आंतरराष्ट्रीय विंडो पुढील तीन वर्षांसाठी उपलब्द आहे. पीसीबीने नेहमीच पीएसएलसाठी या विंडोची निवड केली होती.पीएसबीच्या अध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय कॅलेंडरवर पीएसएलसाठी योग्य विंडो उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आयसीसी बोर्डाच्या विविध सदस्यांचा पाठिंबा मिळवला,” सूत्रांनी द न्यूज, पाकिस्तानला सांगितले.

“मंडळ आर्थिक संकटाच्या काठावर नसेल परंतु जोपर्यंत मीडिया माध्यम आणि व्यावसायिक हक्कांचे सौदे हाताळत नाही तोपर्यंत याचा सामना करावा लागणार आहे. 2021, 2022 आणि 2023 आवृत्तीत पीएसएलची विंडो उपलब्ध आहे, त्यामुळे पीसीबी हक्कांची विक्री करण्याच्या अधिक चांगल्या स्थितीत आहे,” असेही सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि रशीद लतीफ यांनी बीसीसीआयवर निशाणा साधतटी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी प्रभाव पडण्याचा आरोप केला. या विषयावर ते काय भाष्य करतात हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे.