कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट विश्वावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे आशिया चषक, इंग्लंडचा भारत दौरानंतर आता आयसीसीने ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धा स्थगित केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धा पार पडणार होती. नुकतीच पार पडलेल्या बैठकीत टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा आयसीसीने केली आहे. यावेळी आयसीसीने पुढील तीन वर्षात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. यातच ऑस्ट्रेलिया सरकारनेही कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. ऑस्ट्रेलियावरचे आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचे आयोजन करणे अशक्य असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केले होते. त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलणे जाणे ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती. हे देखील वाचा- ICC Men's T20 World Cup 2020 Postponed: कोरोनामुळे आयसीसीने टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलले

एएनआयचे ट्वीट-

आयसीसीने पुढील तीन विश्वचषकाच्या जाहीर केलेल्या तारखा खालील प्रमाणे-

-आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 (ऑक्टोबर- नोव्हेंबर 2021, अंतिम सामना 14 नोव्हेंबर)

-आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ऑक्टोबर- नोव्हेंबर 2022, अंतिम सामना 13 नोव्हेंबर)

- आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ऑक्टोबर- नोव्हेंबर 2023, अंतिम सामना 26 नोव्हेंबर)

यंदाचा स्थगित झालेल्या विश्वचषक 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे. कारण, भारताकडे 2021 मधील विश्वचषकाचे यजमानपद आहे. मात्र, आयसीसीने 2021 आणि 2022 विश्वचषकाच्या आयोजकाची नावे जाहीर केली नाहीत.