New Zealand Women National Cricket Team vs Australia Women National Cricket Team 3rd ODI 2024 Scorecard: न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 23 डिसेंबर रोजी वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 75 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खीशात घातली. या सामन्यात ॲनाबेल सदरलँडने बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली. ॲनाबेल सदरलँडने 9 षटकांत 39 धावांत 3 बळी घेतले. तर त्याने 43 चेंडूत 6 चेंडूत 42 धावा केल्या. ॲनाबेल सदरलँडला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. याशिवाय ॲनाबेल सदरलँडला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही मिळाला. (हेही वाचा:AUS W vs NZ W 3rd ODI 2024 Mini Battle: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिलांच्या मिनी लढतीत या खेळाडूंमध्ये होणार चुरशीची स्पर्धा)
ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली
ऑस्ट्रेलिया महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार ॲलिसा हिली आणि सलामीवीर फोबी लिचफिल्डने पहिल्या 10 षटकात 61 धावा जोडल्या. त्यानंतर 15 व्या षटकात 88 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. कर्णधार ॲलिसा हिली 39 धावा करून अमेलिया केरची शिकार झाली. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने 74 धावा केल्या.
फोबी लिचफिल्ड 50 धावा करून बाद झाला, तर ॲनाबेल सदरलँडने 42 धावा केल्या, एलिस पेरीने 14 धावा केल्या आणि बेथ मुनीने 2 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ 49 षटकांत 290 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडसाठी अमेलिया केरने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. अमेलिया केरने 10 षटकात 54 धावा देत 4 बळी घेतले. तर रोझमेरी मायरने 3 आणि कर्णधार सोफी डिव्हाईनने 2 विकेट घेतल्या.
न्यूझीलंडची फलंदाजी फ्लॉप ठरली
291 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 43.3 षटकात 215 धावांत बाद झाला. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. संघाने 43 धावांवर पहिली विकेट गमावली. इसाबेला रोज जेम्स 24 धावा करून ॲनाबेल सदरलँडची बळी ठरली. यानंतर अमेलिया केर आणि सुझी बेट्समध्ये अर्धशतकी भागीदारी झाली.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने 25, ब्रुक हॅलिडेने 27 आणि मॅडी ग्रीनने 39 धावा केल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून ॲनाबेल सदरलँड आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर किम गर्थ आणि डार्सी ब्राउनने 1-1 विकेट घेतली.