NZ vs AUS 1st T20I: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या लिलावात अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागवण्यात आली असून ऑस्ट्रेलियाचा (Australia) अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा (Glenn Maxwell) देखील यामध्ये समावेश होता. फ्लॉप कामगिरीनंतरही आयपीएलमध्ये (IPL) प्रत्येक वेळी मॅक्सवेलने मोठी बोली आकर्षित करणाऱ्या मॅक्सवेलवर यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 14.25 कोटींचा पाऊस पडला. एवढी मोठी किंमत म्हणजे जवळजवळ प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) उच्च किंमतीला विकल्याच्या 4 दिवसानंतर पहिल्याच सामन्यात मॅक्सवेल फ्लॉप ठरला आणि फक्त 1 धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला. मागील वर्षी देखील मॅक्सवेलवर किंग्स इलेव्हन पंजाबने 10.75 कोटींचा दाव लावला होता, मात्र ऑस्ट्रेलियन अष्टपैलू पूर्णतः अपयशी ठरला. अशास्थितीत, मॅक्सवेलच्या फ्लॉप खेळीनंतर आता आरसीबी (RCB) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली असून ते विराट कोहलीच्या संघाची फिरकी घेत आहेत. (IPL 2021 Auction: आयपीएल 14 च्या लिलावात विदेशी खेळाडूंचा बोलबाला, 'या' क्रिकेटपटूंसाठी लागली तगडी बोली; टॉप-5 मध्ये एकच भारतीय)
मॅक्सवेलसाठी आयपीएल लिलावात मोठी बोली आकर्षित केल्यामुळे ऑस्ट्रेलियन अष्टपैलूकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करणे सहाजिकच आहे, परंतु अवघ्या 4 दिवसात मॅक्सवेलने आरसीबीला पहिला धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजांप्रमाणेच क्राईस्टचर्च (Christchurch) येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पहिल्या टी-20 सामन्यात मॅक्सवेल फ्लॉप ठरला. यजमान किवी संघाने दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात अवघ्या 16 धावांवर कांगारू संघाचे आघाडीचे 3 फलंदाज पॅव्हिलियनमध्ये परतले. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे नेटकऱ्यांनी आरसीबीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पहा ट्विट्स:
मॅक्सवेल ते आरसीबी
Glenn Maxwell who was bought for 14.25cr by RCB goes a 1 run.
Maxwell to RCB :#NZvAUS pic.twitter.com/xyoLPFS2Hd
— Rohit🤙🏻💥 (@sarcasterrk) February 22, 2021
मॅक्सवेल इतर कुठेतरी व्यस्त
Glenn Maxwell is busy somewhere else😉
#NZvAUS pic.twitter.com/lrp1gCOsUz
— Roshni~♡✰ 。* (@Pehle_se_Gyaani) February 22, 2021
आरसीबी प्रभाव
RCB EFFECT #NZvAUS #GlennMaxwellpic.twitter.com/ar2b84g5tA
— Aryan singh 🇮🇳 (@im_aryansingh) February 22, 2021
मॅक्सवेल आणि जोश फिलिप स्वस्तात आऊट झाल्यावर आरसीबी!
RCB after both Maxwell and Josh Phillipe get out cheaply #NZvAUS #RCB #GlennMaxwell #IPL pic.twitter.com/fOD8AMZ688
— VSK🏏 (@KadakiaVicky) February 22, 2021
मॅक्सवेलची कामगिरी पाहून कोहली
Kohli after seeing Maxwell's performance#Maxwell #GlennMaxwell #RCB #NZvsAUS pic.twitter.com/UKn3G7XDNR
— raaj_biradar (@BiradarRaaj) February 22, 2021
मॅक्सवेल आउट
Fraud Glenn Maxwell out😭
Le @RCBTweets fans:-#NZvAUS pic.twitter.com/OuxgTxbY3s
— SHUBHAM (@RohitianShubham) February 22, 2021
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात एकूण बेंगलोर टीमचे एकूण 6 खेळाडू खेळले. जोश फिलिप, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, अॅडम झांपा, मॅक्सवेल आणि किवी संघाचा काईल जेमीसन. फिलिपने 2 तर सॅम्सने 1 धाव केली. झांपा 13 धावा करून नाबाद परतला मात्र, त्याला गोलंदाजीने प्रभाव पडता आला नाही. झांपाने 3 ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या. दुसरीकडे, किवी स्टार गोलंदाज जेमीसनने 3 ओव्हरमध्ये 32 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली.