IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव चेन्नई येथे नुकताच संपुष्टात आला आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात विदेशी खेळाडूंची अधिक मागणी असल्याचं दिसत आहे. आयपीएलच्या लिलावात 291 खेळाडू आपले नशीब आजमावू पाहत तर आतापर्यंत विदेशी खेळाडूंवर फ्रँचायझींनी पैशांची बरसात केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात महागड्या खेळाडूंमध्ये विदेशी क्रिकेटपटू आघाडीवर आहेत, तर भारतीय खेळाडूंना अधिक भाव मिळाला नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या खेळाडूंच्या मांदियाळीत सामील झाला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले आहे. दुसरीकडे, यंदाच्या लिलावात महागड्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे. (IPL 2021 Auction: आला रे आला! आयपीएलमध्ये Arjun Tendulkar याची एंट्री, 14व्या हंगामात बेस प्राईसवर ‘या’ संघाने केला समावेश)
क्रिस मॉरिस (Chris Morris)
आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मॉरिसला राजस्थान रॉयल्स संघाने यावेळी 16 कोटी 25 लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने देशाच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत 70 सामन्याच्या 44 डावात 23.9 च्या सरासरीने 551 धावा केल्या असून 70 सामन्यात 80 विकेट घेतल्या आहेत.
काईल जेमीसन (Kyle Jamieson)
न्यूझीलंडचा उदयोन्मुख स्टार अष्टपैलू खेळाडू जेमीसन यावर्षी लिलावात विकला गेलेला दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. जेमीसनला विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 15 कोटींमध्ये खरेदी केले आहे.
How's that for numbers 💥💥
Here are the 🔝5️⃣ buys in the @Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/SPagm8laZo
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची लिलावात चमत्कारी कामगिरी यंदाही कायम राहिली. मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 14 कोटी 25 लाखांच्या मोठ्या रकमेवर खरेदी केले आहे.
झे रिचर्डसन (Jhye Richardson)
आयपीएल 2021 मध्ये विकलेला चौथा महागडा खेळाडू म्हणजे झे रिचर्डसन. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला पंजाब किंग्ज संघाने 14 कोटींमध्ये खरेदी केले.
कृष्णप्पा गौतम (K Gowtham)
भारताचा 32 वर्षीय अनुभवी कृष्णप्पा गौतम यंदा आयपीएलमध्ये भारतासाठी सर्वाधिक महागड्या क्रिकेटपटूंपैकी आहे. गौतमला धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने 9 कोटी 25 लाखांमध्ये खरेदी केले आहे. गौतमने या प्रतिष्ठित स्पर्धेत आतापर्यंत 24 सामने खेळले असून 13 विकेट घेतल्या आहेत आणि 19 डावात 186 धावा केल्या आहेत.