
IPL 2025 live streaming: आयपीएल 2025 चे बिगुल वाजला आहे. सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. 10 संघ सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. पहिला सामना 22 मार्च रोजी आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात खेळला जाईल. चाहतेही आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी आयपीएलचे (IPL 2025) लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर होईल. मात्र, यावेळी प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतील.
जिओ हॉटस्टारचा प्लॅन
यावेळी आयपीएलचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत असणार नाही. जिओ हॉटस्टारच्या बेसिक प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एका महिन्यासाठी 149 रुपये खर्च करावे लागतील. जाहिरातमुक्त योजना तीन महिन्यांसाठी 499 रुपयांना उपलब्ध असेल. या योजनेत तुम्ही आयपीएल व्यतिरिक्त इतर क्रीडा स्पर्धा देखील पाहू शकता.
इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक आहे. लवकरच आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. दरवर्षी अनेक चाहते स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहतात तर याहूनही अधिक चाहते मोबाईल तसेच डिजीटल गॅजेट्स आणि टीव्हीवर हे सामने पाहण्याचा आनंद घेतात. परंतु आता अंबानींनी आयपीएल 2025 पूर्वी मोठा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.
Viacom18 आणि Star India यांचं विलीनीकरण झालं असून याद्वारे तयार झालेल्या नव्या कंपनीला JioStar असं नाव देण्यात आलंय. JioCinema आणि Disney+ Hotstar स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे विलीनीकरण JioStar बनल्यानंतर नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, JioHotstar लाँच करण्यात आले.