पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सला मोठा धक्का, बांग्लादेश बोर्डाने पाकमध्ये टेस्ट मालिका खेळण्यास दिला नकार
बांग्लादेश टेस्ट टीम (Photo Credit: Instagram/bangladeshtigers)

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पाकिस्तान (Pakistan) मध्ये कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान मीडियाच्या माहितीनुसार बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन (Nazmul Hassan) म्हणाले की त्यांच्या सरकारच्या सल्ल्यानुसार ते पाकिस्तानमध्ये फक्त टी-20 सामने खेळू शकतात आणि सध्या पाकिस्तानमध्ये कसोटी सामने खेळण्याची कोणतीही शक्यता नाही. याची माहिती बीसीबी (BCB) लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला देईल आणि वेळापत्रकात बदल केले जातील. दरम्यान, यापूर्वी हसन यांनी म्हटले होते की बांग्लादेशी खेळाडूंवर पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यासाठी दबाव आणणे योग्य नाही. बांग्लादेशी सरकारने बीसीबीला फक्त टी-20 साठी सुरक्षा मंजुरी दिली आहे.हसन यांचा विश्वास आहे की या सर्व गोष्टी असूनही खेळाडूंवर पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी दबाव आणला जाऊ शकत नाही आणि त्यासाठी खेळाडूंची संमती सर्वात महत्त्वाची आहे. 'आम्ही आमच्या खेळाडूंना पाकिस्तानात जाण्यास भाग पाडू शकत नाही', जर एखाद्या खेळाडूला तेथे जायचे नसेल तर तो जाणार नाही',असे हसन म्हणाले होते.

यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते की पाकिस्तानने बांग्लादेश बोर्डावर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका न खेळण्यासाठी दबाव आणला आहे. पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्यास नकार देण्यात आला होता. दुसरीकडे, पाकिस्तानमधील सुरक्षेमुळे बरेच मोठे खेळाडू टी-20 मालिका खेळण्यासही तयार नसल्याचे समजले जात आहे. आगामी मालिकेसाठी पाकिस्तान बोर्डाने पाठवलेल्या वेळापत्रकानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दोन्ही सांघट दोन कसोटी आणि दोन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. तिन्ही टी-20 लाहोरमध्ये 23, 25 आणि 27 जानेवारीला खेळले जातील, तर कसोटी सामने रावळपिंडी आणि कराची येथे होतील. तथापि, अद्याप या दौऱ्याबद्दल अजूनही शंका आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्रीलंकाने पाकिस्तानचा दौरा केला होता. दोन्ही देशांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेच्या माध्यमातून दहा वर्षानंतर कसोटी क्रिकेट पाकिस्तानमध्ये परतला. याशिवाय, यंदा फेब्रुवारीमध्ये मेरिलबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) अध्यक्ष कुमार संगकारा यांच्या नेतृत्वाखालील एक संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे.