Indian Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team, 2nd ODI Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना आज म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा (Team India) 76 धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खांद्यावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन (Sophie Devine) करत आहे. (हेही वाचा - IND W vs NZ W: राधा यादवने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात घेतला सुपर कॅच, Video पाहून तुम्ही ही कराल कौतुक )
तत्पूर्वी, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी अवघ्या 93 चेंडूत 87 धावा केल्या. न्यूझीलंड संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 259 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिव्हाईनने सर्वाधिक 79 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान सोफी डिव्हाईनने 86 चेंडूत सात चौकार आणि एक षटकार ठोकला. सोफी डिव्हाईनशिवाय सुझी बेट्सने 58 धावा केल्या.
पाहा पोस्ट -
🇳🇿 New Zealand beat India by 76 Runs
The series is now level 1-1 with the decider to be played on 29th October.#CricketTwitter #INDvNZ pic.twitter.com/mmmm2lr9ng
— Female Cricket (@imfemalecricket) October 27, 2024
जॉर्जिया प्लिमरच्या रूपाने दीप्ती शर्माने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून राधा यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. राधा यादवशिवाय दीप्ती शर्माने दोन बळी घेतले. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 260 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 26 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. एकही फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. संपूर्ण भारतीय संघ 47.1 षटकात अवघ्या 183 धावांवर गारद झाला. टीम इंडियाकडून राधा यादवने सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. राधा यादवशिवाय कर्णधार सायमा ठाकोरने 29 धावा केल्या.
ली ताहुहूने न्यूझीलंड संघाला पहिले यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून ली ताहुहू आणि सोफी डेव्हाईन यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. ली ताहुहू आणि सोफी डेव्हाईन यांच्याशिवाय जेस केर आणि ईडन कार्सनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजेपासून खेळवला जाईल.