BJ Watling Retirement: न्यूझीलंडचा (New Zealand) यष्टिरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंगने (BJ Watling) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर न्यूझीलंड संघ यजमान संघाविरुद्ध दोन कसोटी सामने आणि त्यानंतर संघ 18 जून रोजी साऊथॅम्प्टन येथे भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) फायनल मुकाबला खेळेल. यासह, वॉटलिंग न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी सामन्यातील विकेटकीपर बनेल आणि आपली 12 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आणेल. वॅटलिंगपूर्वी हा विक्रम अॅडम पारोर (Adam Parore) यांच्या नावावर होता. 35 वर्षीय वॅटलिंगने ब्लॅककॅप्ससाठी 73 कसोटी, 28 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले आहेत. न्यूझीलंड संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळण्यामागे वॅटलिंगने महत्वाची भूमिका बजावली आहे. 35 वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाने 73 कसोटी सामन्यात 8 शतकांसह 3773 धावा केल्या आहेत. (ICC WTC Final: या 3 किवी खेळाडूंपासून 'विराटसेने'ला राहावे लागणार सावध, फायनलमध्ये ठरू शकतात डोकेदुखी!)
निवृत्तीची घोषणा करताना वॅटलिंग म्हणाले की, “न्यूझीलंड संघासाठी खेळणे हा मोठा सन्मान आहे. कसोटी क्रिकेट हा खरोखरच या खेळाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि संघासाठी पांढर्या कपड्यांमध्ये मैदानात उतरणे हे माझ्यासाठी खूप विशेष होते. पाच दिवसांनंतर टीमसोबत बीयर घेऊन सीटिंग रूममध्ये बसणे मला सार्वधिक आठवेल. मी काही महान खेळाडूंबरोबर खेळलो आणि चांगले मित्र बनवले. मला बर्याच खेळाडूंकडून खूप मदतही मिळाली ज्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” 2019मध्ये बे ओव्हलमध्ये त्याने जेव्हा इंग्लंडविरुद्ध तेव्हा तो असा कारनामा करणारा फक्त 9 वा विकेटकीपर आणि इंग्लंडविरुद्ध द्विशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला. वॅटलिंग फलंदाजीच्या दृढ दृष्टिकोनासाठी ओळखला जातो. अलीकडेच दुसऱ्यांदा बाप बनलेल्या वॅटलिंगने त्यांच्या कारकिर्दीत मिळालेल्या सहकार्याबद्दल कुटुंबाचे आभार मानले. निवृत्तीच्या निर्णयामुळे न्यूझीलंडअस्थी आगामी कसोटींमध्ये चांगली कामगिरी करण्यास मदत करण्याच्या दिशेने त्याचे लक्ष कमी होणार नाही, असे मत वॅटलिंगने व्यक्त केले.
🗣📹 @B_Jwatling in his own words on retiring from all cricket after the @ICC World Test Championship Final in June against India. Watling will leave the game having represented New Zealand more than 100 times and @ndcricket 243 times. #WTC21 pic.twitter.com/isrgA6aoTy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) May 11, 2021
वॅटलिंग एक यशस्वी विकेटकीपर देखील आहे. वॅटलिंगनेआपल्या यशस्वी कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यापर्यंत 249 कॅच (फील्डर म्हणून 10) आणि आठ स्टम्पिंग्स केल्या आहेत. न्यूझीलंड क्रिकेटचे चीफ एक्झिक्युटिव्ह डेविड व्हाईट यांनी वॅटलिंगची खालच्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमता आणि विकेटच्या मागे असलेल्या कार्यक्षमतेबद्दल विशेष कौतुक केले. वॉटलिंगने कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत 3773 धावा केल्या आहेत.