World Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत
बेन स्टोक्स (Photo Credit: ICC/Twitter)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात खेळण्यात आलेल्या विवादास्पद फायनल सामन्याची पूर्ण जगात टीका होत आहे. सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हर देखील टाय झाली आणि इंग्लंडने सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याच्या आधारावर पहिल्यांदा जेतेपद पटकावले. एकीकडे या कारणामुळे चाहत्यांनी आणि विशेषज्ञानीं आयसीसीवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या शेवटच्या षटकात अधिक धावा दिल्यानंतरही आयसीसीवर संपूर्ण क्रिकेट जगत नाराज दिसत आहे. thetimes.co.uk च्या रिपोर्टनुसार, एमसीसी (MCC) आता या ओव्हरथ्रोच्या नियमाचे पुनरावलोकन करण्याच्या विचारात आहे. (न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक फायनलमध्ये बेन स्टोक्स ला दिलेल्या ओवरथ्रो विवादावर जेम्स अँडरसन चा मोठा खुलासा)

इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमधील 3 चेंडूत 9 धावांची गरज होती. बेन स्टोक्स (Ben Stokes) ने मारलेला चेंडू सीमारेषेवर गेला. चेंडू सीमारेषेवर अडवेपर्यंत स्टोक्स दुसरी धाव घेण्यासाठी निघाला होता आणि धाव पूर्ण करण्यासाठी त्याने झेप घेतली. पण त्याच वेळी सीमारेषेवरून मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याने फेकलेला चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. त्यामुळे इंग्लंडला 4 अतिरिक्त धावा मिळाल्या ज्याच्यामुळे संपूर्ण सामन्याचा परिणाम बलून गेला.

दरम्यान, सायमन टॉफल (Simon Taufel) यांनी फॉक्सस्पोर्ट्स डॉट कॉम डॉट ओयू शी बोलतान ओव्हर थ्रोच्या सहा धावांचा निर्णय चुकीचा असल्याचे मत मांडले आहे. टॉफल म्हणाले की, मैदानावरील अंपायरांकडून चूक झाल्याचे स्पष्ट आहे. निर्णय घेण्यात मैदानावरील अंपायर चुकले. इंग्लंडला पाच धावा देणे अपेक्षित होते. मैदानावरील गोंधळामध्ये दुसरी धाव घेताना फलंदाजांनी एकमेकांना गप्टिलने चेंडू उचलून थ्रो करण्याआधीच क्रॉस केल्याचे पंचांना वाटले असणार. अर्थात पंचांचा हा अंदाज चुकल्याचे टीव्हीवरील अॅक्शन रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.’