
New Zealand National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd ODI 2025 Live Streaming: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 2 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 73 धावांनी पराभव केला. यासह, यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता किवी संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघाला हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. कारण त्यांच्यासाठी हा सामना करो या मरो असा आहे. मायकेल ब्रेसवेल किवी संघाचे नेतृत्व करेल. तर मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर पाकिस्तानचे नेतृत्व असेल.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 2 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जाईल. या सामन्याचा नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता?
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड संघ: विल यंग, निक केली, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट, मुहम्मद अब्बास, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मिशेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, जेकब डफी, विल्यम ओ'रोर्क, बेन सियर्स, आदित्य अशोक.
पाकिस्तान संघ: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहीर, इरफान खान, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अली, आकीफ जावेद, फहीम अश्रफ, अबरार अहमद, खुशदिल शाह, सु मोहम्मद वसीम जॅर