टीम सेफर्टला कोविड स्थितीची आठवण करत अश्रू अनावर (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) घटनेत भारतात घसरण दिसून येत आहे, तथापि आयपीएल  (IPL) 2021 दरम्यान कोविड-19 पॉझिटिव्ह आढळलेल्या विदेशी खेळाडूंसाठी मागील काही दिवस आव्हानात्मक ठरले. माध्यमांशी संवाद साधताना न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेटर टिम सेफर्ट (Tim Seifert) भारतात आयसोलेशनमध्ये असताना आपल्या कठीण काळाची आठवण संघटना गहिवरला आणि लाईव्ह मुलाखतीदरम्यान त्याला अश्रू अनावर झाले. परदेशी खेळाडूंपैकी बहुतेक जण आपापल्या घरी रवाना झाले असताना मध्यम स्वरूपाच्या लक्षणांमुळे पॉझिटिव्ह चाचणीमुळे सेफर्टला भारतात रहावे लागले होते. “चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) व्यवस्थापकाने माझी कोरोना टेस्ट सकारात्मक आल्याचे सांगितले. ही गोष्ट कळताच मी सुन्न झालो, संपूर्ण जग थांबले होते आणि मी पुढे काय याचा विचारच करू शकत नव्हतो. ती सर्वात भयानक बाब होती. आपण वाईट गोष्टींबद्दल ऐकता आणि मला वाटले की हे माझ्याबाबतीत घडेल,” सेफर्ट म्हणाला. त्याने हे देखील म्हटले की त्याला स्पर्धेच्या बायो बबलमध्ये कधीही असुरक्षित वाटले नाही. (IPL 2021 Resumption: आयपीएलचा दुसरा टप्पा UAE येथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात? 29 मे रोजी घोषणेची शक्यता)

दरम्यान, अखेर गेल्या आठवड्यात सेफर्ट न्यूझीलंडला परतला आणि सध्या एका हॉटेलमध्ये तो 14 दिवसांसाठी क्वारंटाईन आहे. या दरम्यान, न्यूझीलंडचे ज्येष्ठ क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनी त्याला पुष्कळ पाठिंबा दर्शविला आहे असे सेफर्टचे कौतुक करत म्हटले. “त्यांनी सर्वकाही खूपच सुलभ केले. त्यांनी सर्व गोष्टी निश्चित केल्या जातील याची खात्री केली आणि सीएसके (CSK) व्यवस्थापन व कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी सर्वकाही ठीक होईल याची जाणीव करून देणे मला सोपे केले आणि घरी जाण्याची वेळ येईल तेव्हा मला सुखरूप पाठवण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले,” त्याने पुढे मुलाखतीत म्हटले. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांच्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळणारा सेफर्ट तिसरा केकेआर खेळाडू होता. त्याने हे देखील म्हटले की त्याला स्पर्धेच्या बायो बबलमध्ये कधीही असुरक्षित वाटले नाही.

ब्लॅककॅप्स

सनरायझर्स हैदराबादचा (एसआरएच) रिद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) अमित मिश्रा यांची 4 मे रोजी विषाणूची सकारात्मक चाचणी आल्यानंतर 14 वे आयपीएल अनिश्चित काळासाठी निलंबित केले गेले. त्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी, फलंदाजी प्रशिक्षक माइकल हसी आणि बस क्लिनर यांची देखील कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. दुसरीकडे, आता उर्वरित 31 सामन्यांसाठी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबरच्या विंडोकडे लक्ष ठेवून आहे. शिवाय, बीसीसीआय आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने युएईमध्ये आयोजित करण्याची शक्यता आहे.