IPL 2021 Resumption: आयपीएलच्या (IPL) बायो-बबलमध्ये कोविड-19 (COVID-19) प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. वरुण चक्रवर्ती, रिद्धिमान साहा आणि इतरांची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली ज्यानंतर बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय केला. आता बोर्ड युएईमध्ये (UAE) 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या (IND vs ENG Series) वेळापत्रकात काही बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे बीसीसीआय इंग्लिश क्रिकेट बोर्डाला हे अंतर चार दिवसांनी कमी करण्याची आणि वेळेपूर्वीच मालिका गुंडाळण्याची विनंती करेल. आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाला तोपर्यंत स्पर्धेचे 29 सामने खेळवले गेले होते. (IND vs ENG Test: आयपीएल 2021 साठी बदलले जाईल इंग्लंड विरोधात टीम इंडियाच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक? ECB ने दिले स्पष्टीकरण)
यामुळे 30 दिवसांचा कालावधी उपलब्ध होईल जो स्पर्धेतील उर्वरित खेळ आयोजित करण्यासाठी पुरेसा आहे. जर ते अंतर चार दिवसांनी कमी करता आले तर बीसीसीआयला पाच अतिरिक्त दिवस मिळतील, असे सूत्रांनी एका वृत्तपत्राला सांगितले. मात्र, जर हे अंतर कमी करण्यास ईसीबी सहमत नसेल तर बाद फेरीचे सामने नंतर आयोजित केले जाऊ शकतात. यात साहजिकच बाद फेरीतील सामन्यांचा समावेश असेल. 29 मे 2021 रोजी होणाऱ्या विशेष असेंब्ली बैठकीत आयपीएल 2021 बाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. आगामी बैठकीत बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमीन यांनी दोन शक्यता प्रस्तावित केल्या आहेत. युएई आणि यूके येथे स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन केले जाण्याचा प्रस्ताव सामील आहे. तथापि, स्पष्ट कारणांमुळे ही स्पर्धा युएईमध्ये व्हावी, अशी बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची इच्छा आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयच्या या बैठकीत आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर देखील चर्चा अपेक्षित आहे. आयसीसी टी -20 वर्ल्डकप 18 ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे. पण भारतात कोविड-19 चे संकट कायम राहिल्यास युएई येथे स्पर्धा खेळवणे हा एक पर्याय उपलब्ध आहे ज्याच्यावर आयसीसी 2 जून रोजी AGM मध्ये निर्णय घेईल. परंतु बीसीसीआय अजूनही विश्वचषक भारतात खेळवण्यावर भर देत आहे जेणेकरून यूएई स्टेडियम आयपीएल सामन्यांसाठी उपलब्ध असेल.