Netherlands National Cricket Team Beat United States of America National Cricket Team Scorecard: नेदरलँड्स नॅशनल क्रिकेट टीम (Netherlands National Cricket Team) विरुद्ध युनायटेड स्टेट्स नॅशनल क्रिकेट टीम (United States of America National Cricket Team Scorecard) (NED vs USA) यांच्यातील टी-20 त्रिकोणी मालिकेतील तिसरा सामना उट्रेचमधील स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड येथे खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड संघाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा 102 धावांनी पराभव करत या मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. दोन गुण मिळवून नेदरलँडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. नेदरलँडचे एकूण चार गुण आहेत. तर कॅनडा आणि अमेरिकेचा प्रत्येकी एक गुण आहे. या मोसमात राऊंड-रॉबिन फॉरमॅटचा वापर केला गेला आहे, जिथे प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी दोनदा सामना करेल. प्रत्येक विजयासाठी दोन गुण दिले जातील आणि सर्वाधिक गुण आणि त्यानंतर सर्वोत्तम नेट रन रेट मिळविणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाईल.
या त्रिकोणी मालिकेत चॅम्पियन ठरवण्यासाठी कोणताही अंतिम सामना होणार नाही. दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने कॅनडाचा 5 गडी राखून पराभव करत दोन गुण मिळवले. पाहुण्या संघ कॅनडाचा पहिला पराभव झाला. (हे देखील वाचा: WI vs SA, 2nd T20I Live Streaming: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार दुसरा टी-20 सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह)
तिसऱ्या टी-20 सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नेदरलँड संघाची सुरुवात चांगली झाली. दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 77 धावा जोडल्या. नेदरलँड्सच्या फलंदाजांनी गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. नेदरलँड संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 217 धावा केल्या. नेदरलँड्सकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 40 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 81 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सशिवाय सलामीवीर मायकेल लेविटने 68 धावा केल्या. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्क्विकने सर्वाधिक तीन बळी घेतले. याशिवाय जुआनोय ड्रायस्डेल आणि हरमीत सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी अमेरिकेच्या संघाला 20 षटकात 218 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या युनायटेड स्टेट्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 33 धावांवर तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर ॲरॉन जोन्ससह शायन जहांगीरने डाव सांभाळला, पण पराभव वाचवता आला नाही. युनायटेड स्टेट्सचा संपूर्ण संघ 15.4 षटकात केवळ 115 धावा करून बाद झाला. अमेरिकेकडून शायान जहांगीरने सर्वाधिक 37 धावा केल्या. यानंतर आरोन जोन्सने 34 धावांची खेळी केली. नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. विक्रमजीत सिंगशिवाय काइल क्लेन आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उद्या म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी नेदरलँड्स आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्यातही सामना होणार आहे. हा सामना या मालिकेतील चौथा सामना असेल.