WI vs SA, 2nd T20I Live Streaming: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार दुसरा टी-20 सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

WI vs SA: वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

WI vs SA, 2nd T20I Live Streaming: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार दुसरा टी-20 सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
WI vs SA (Photo Credit - X)

West Indies Cricket Team vs South Africa National Cricket Team: कसोटी मालिकेनंतर, वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (West Indies Cricket Team) आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री साडेबारा वाजता हा सामना खेळला जाईल. वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलकडे असेल. तर एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याला रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 12 वाजता टॉस होईल. तसेच दोन्ही देशामधील टी-20 मालिका भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर चाहत्यांना हा सामना मोबाईलवर फॅन कोड एपवर पाहायला मिळेल. (हे देखील वाचा: WI vs SA, 2nd T20I Head To Head: वेस्ट इंडिज- दक्षिण आफ्रिकामध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेटमध्ये कोणाची आकडेवारी भारी?)

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

वेस्ट इंडिज: जॉन्सन चार्ल्स (विकेटकीपर), होप, रोस्टन चेस, पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, ओबेद मॅककॉय, शामर जोसेफ आणि गुडाकेश मोती.

दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), मार्कराम (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, ट्रिस्टन स्टब्स, विआन मुल्डर, डोनोव्हान फेरेरा, नंद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, ब्योर्न फोर्टुइन, ओटनीएल बार्टमन.

(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2024 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).