IND W vs WI W (Photo Credit - X)

India Women's Nation Cricket Team vs West Indies Women's Cricket Team: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय महिला संघ विजयी मार्गावर परतला आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता हमरनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सलग दुसरा विजय मिळवून मालिका जिंकण्याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर पाहुण्या संघ वेस्ट इंडिजची नजर टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्या विजयावर असेल. स्मृती मंधानाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याने 66 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वात मोठी खेळी खेळली. तिने 35 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. तीत साधूने सर्वाधिक 3 बळी घेतले होते.

किती वाजता सुरु होणार सामना?

भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यातील दुसरा टी-20 सामना मंगळवारी (17 डिसेंबर 2024) खेळवला जाईल. तसेच हा दुसरा टी-20 सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.00 खेळवला जाणार आहे. तसेच नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.

कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?

भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतात स्पोर्ट्स 18 वाहिनीवर प्रसारित केला जाईल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि वेबसाइटवर केले जाईल. (हे देखील वाचा: ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवला जाणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद)

दोन्ही संघाचे खेळाडू

भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, नंदिनी कश्यप, राघवी बिस्त, प्रिया मिश्रा, मिन्नू मणी

वेस्ट इंडिज महिला संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, शबिका गजनाबी, ऍफी फ्लेचर, झैदा जेम्स, मँडी मंगरू, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल, रशादा विल्यम्स, आलिया ॲले अश्मिनी मुनिसार, नेरिसा क्राफ्टन