ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली.

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद
AFG vs ZIM (Photo Credit - X)

Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team 1st ODI 2024 Live Streaming: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 2-1 ने पराभव करत मालिका नावावर केली. अशा परिस्थितीत दोन्ही संघाच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. वनडे मालिकेत झिम्बाब्वेचे कर्णधारपद क्रेग एर्विनच्या खांद्यावर असेल. तर दुसरीकडे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानची कमान सांभाळेल.दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवार, 17 डिसेंबर रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल. (हे देखील वाचा: ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या)

कुठे पाहणार थेट प्रेक्षपण?

आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या भारतातील टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या प्रसारणाविषयी कोणतीही माहिती नाही. तथापि, एकदिवसीय मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून पहिल्या वनडे सामन्याचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

झिम्बाब्वे संघ: ब्रायन बेनेट, तादिवनाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, क्रेग एर्विन (कर्णधार), शॉन विल्यम्स, अलेक्झांडर रझा, ताशिंगा मुसेकिवा, टिनोटेंडा मापोसा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, व्हिक्टर न्याउची, वेलिंग्टन मसाकादझा, ट्रेव्हर ग्वांडू, जॉयलॉर्ड गॅम्बी, बेन कुरान, न्यूमन न्यामौरी

अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रहमत शाह, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, एएम गझनफर, नांगेलिया खारोते अहमद मलिक, इक्रम अलीखिल, अब्दुल मलिक, बिलाल सामी, नवीद झद्रा

(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2024 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).