विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) शानदार कामगिरीची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी विजयापासून न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 मालिका विजयात भारतीय संघाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामन्यात आणि वर्ल्ड कपच्या सेमीफायनल फेरीत भारताचे नेतृत्व केले होते. दुसरीकडे रोहित शर्माने (Rohit Sharma) जेव्हा जेव्हा संघाने नेतृत्व भूमिका दिली तेव्हा त्यानेही चांगली कामगिरी बजावली. शिवाय, रोहितने विराट कोहलीला उपकर्णधार म्हणून आपले मूल्यवान इनपुट दिले आहेत. 2019 वर्ल्ड कप आणि त्यापूर्वी आशिया चषकमध्ये बॅटिंग व नेतृत्वाने रोहितच्या कामगिरीने चाहत्यांवर मोठा प्रभाव पडला आहे त्यामुळेच त्याला टीम इंडियाच्या मर्यादित ओव्हर संघाची जबाबरी देण्याची मागणी नियमितपणे केली जात आहे. या लेखात रोहितला भारताच्या मर्यादित संघाचा कर्णधार का केलं पाहिजे याच्या कारणांचा आढावा घेण्यात आहोत. (Happy Birthday Rohit Sharma: टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आहे ‘या’ 5 विश्वविक्रमांचा बादशाह, जाणून जाल चक्रावून)
1. आयपीएल रेकॉर्ड
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहितचा प्रभावी विक्रम आहे. रोहितने टी-20 लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून पाच जेतेपद पटकावले आहे तर दुसरीकडे, विराट कोहली अद्याप आयपीएल ट्रॉफी उंचावत आलेली नाही. रोहित मुंबई इंडियन्समधील आपल्या खेळाडूंपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेण्यात यशस्वी ठरला आहे शिवाय त्याने मोठ्या सामन्यांच्या संकट परिस्थितीत शांततेने निर्णय घेतला आहे.
2. मर्यादित ओव्हरमधील अप्रतिम रेकॉर्ड
सांख्यिकीय दृष्टीने, कोहली हा भारताच्या एकदिवसीय स्वरूपातील सर्वात यशस्वी कर्णधारच नाही तर इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. तथापि, कोहलीच्या तुलनेत रोहितचा अनुभव खूपच छोटा आहे, मात्र दोन्ही स्वरूपामधील त्याच्या यशाची टक्केवारी आशादायक आहे.कर्णधार म्हणून दहा वनडे सामन्यांमध्ये रोहितने 8 जिंकले असून 2 सामने गमावले आहेत, तर कर्णधार म्हणून खेळलेल्या 19 टी-20 सामन्यांपैकी त्याने 15 मध्ये विजय मिळविला आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितला मर्यादित ओव्हरच्या सेटअपमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची संधी फारच कमी मिळाली आहे, तथापि, त्याचे कौशल्या पाहता जर त्याला पूर्ण वेळ भूमिका दिली गेली तर नक्कीच आपली छाप सोडेल.
3. खेळाडूंवर विश्वास ठेवतो
रोहित बऱ्याचदा नेतृत्व करताना खेळाडूंना पाठिंबा देताना आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवताना दिसला आहे. ज्याच्याबद्दल अनेकदा खेळाडूंनीही बोलून दाखवले आहे. रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास दर्शवतो याच कारणामुळे मुंबई संघात फार कमी बदल होताना दिसले आहेत. त्यामुळे तो एक संघ नायक म्हणून यशस्वी ठरला असून भारतीय संघाचे देखील अशाच प्रकारे नेतृत्व करू शकतो विशेषतः संकटाच्या स्थितीत.
4. मोठ्या- स्पर्धांचा कर्णधार
विराटला अद्याप कर्णधार म्हणून आयसीसी किंवा कोणतीही मोठी ट्रॉफी अद्याप जिंकता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वात, टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 आणि न्यूझीलंडकडून 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. याच्या उलट रोहितच्या नेतृत्वात संघाने 2018 निदाहास ट्रॉफी आणि 2018 आशिया कपच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. म्हणूनच, जेव्हा मोठ्या स्पर्धांमध्ये नेतृत्त्वाची चर्चा येते तेव्हा रोहितचा नक्कीच प्रभावी आहे.
5. नेतृत्व वृत्ती
रोहित शर्मा एक नैसर्गिक नेता आहे. दबावाखाली शांत राहण्याची क्षमता रोहितकडे आहे. रोहितने आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना स्वत:ला अनेकदा कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. रोहितकडे नेतृत्व करण्याचा वेगळा मार्ग आहे आणि तो दबावाच्या स्थितीत शांत असतो. रोहित इतर खेळाडूंना त्यांचा खेळ विकसित करण्यासाठी जागा देतो आणि जेव्हा त्याने भारताचे नेतृत्व केले तेव्हा त्याने चांगली कामगिरी बजावली आहे.