National Sports Awards 2022 (संग्रहित संपादित प्रतिमा)

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 (National Sports Awards 2022) साठी खेळाडू आणि प्रशिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. टेबल टेनिसपटू शरथ कमल अंचटा याची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी 25 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सात प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चार खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबर रोजी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना हे पुरस्कार देतील.

मेजर ध्यानचंद खेल पुरस्कार प्राप्त शरथ कमल अचंता अनेक वर्षांपासून भारताचे नाव टेबल टेनिसमध्ये आणत आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी केली, यानंतर आता त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्कार जिंकणाऱ्या बहुतेक खेळाडूंनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पदके आणली. 30 नोव्हेंबर 2022 (बुधवार) रोजी सायंकाळी 4 वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील.

समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासणीनंतर शासनाने खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 'मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार' गेल्या चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीसाठी दिला जातो. गेल्या चार वर्षांच्या कालावधीतील चांगली कामगिरी, नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शविल्याबद्दल उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार' दिला जातो. ‘क्रीडा आणि खेळातील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार’ दिला जातो. (हेही वाचा: मुकेश अंबानींची आता क्रिकेट पाठोपाठ फुटबॉलमध्ये ही एण्ट्री! अंबानी होणार फुलबॉल टीम लिव्हरपूल एफसीचे नवे मालक)

यासह क्रीडा आणि खेळातील जीवनगौरव कामगिरीबद्दल ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. ज्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीद्वारे खेळात योगदान दिले आहे आणि निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धांच्या संवर्धनासाठी योगदान दिले आहे अशा खेळाडूंना हा सन्मान दिला जातो.