National Girl Child Day 2021 निमित्त सचिन तेंडुलकरने मुलगी सारा व मुलगा अर्जुन सोबतचा फोटो शेअर करत दिला खास संदेश, पहा Tweet
सचिन तेंडुलकर, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन समवेत (Photo Credit: Twitter)

भारतभर आज राष्ट्रीय बालिका दिवस (National Girl Child Day) साजरा केला जात आहे. मुलींना त्यांचे हक्क आणि समाजात त्यांच्याबरोबर होत असलेल्या भेदभावाबद्दल जागरूक करण्याचे आजचा हा दिवस साजरा करण्यामागचे प्रथम उद्देश आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाने 2009 मध्ये राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरवात केली. 24 जानेवारीचा दिवस निवडला गेला कारण 1966 मध्ये आजच्याच दिवशी इंदिरा गांधींनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. आजच्या राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त क्रिकेटचा देव आणि भारताचा माजी फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या ट्विटर अकाउंटवर आपली मुलगी सारा (Sara) आणि मुलगा अर्जुन (Arjun) यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि मुला-मुलींना समानतेची वागणुकीची मागणी करत खास संदेशही लिहिला. समानतेची मागणी करत या दिग्गज क्रिकेटपटूने म्हटले की मुली-मुलांना समान वागणूक दिली पाहिजे. (Happy National Girl Child Day 2021 Images: राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त Wishes, Messages, Greetings शेअर करुन द्या खास दिवसाच्या शुभेच्छा!)

सचिनने सारा आणि अर्जुन यांच्या बालपणीचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "आमच्या मुली आणि मुलांसाठी प्रेम, काळजी आणि संधी नेहमीच समान असणे आवश्यक आहे. आपली मुले आपल्याकडून शिकतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. चला आपण योग्य उदाहरण सेट करू आणि आमच्या मुली व मुलांना एकसारखी वागणूक देऊया!"

आजच्या दिवशी मुलींना त्यांचा हक्क मिळावा यासाठी अनेक राजण्यात विविध मोहीम राबविल्या जातात. महिला सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. मुली आणि महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्नही या मोहिमेच्या माध्यमातून उपस्थित केले गेले आहेत. मुलींची सुरक्षा, शिक्षण, लिंग गुणोत्तर, आरोग्य यासारख्या मुद्द्यांचा केवळ आजच नव्हे तर दररोज विचार केला पाहिजे. मुलींनाही समान हक्क दिले जावेत. इतरांना जे काही मिळेल ते करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे मुलींनाही मिळाले पाहिजे. आज आपण सर्वांनी राष्ट्रीय बालिका दिन फक्त साजरा न करता आपण सर्वांनी मुलींचा सन्मान करू आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहित करू अशी शपथ आपल्या सर्वांनी घेतली पाहिजे.