राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यासाठी भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला. त्यानंतर 2008 पासून जानेवारी महिन्यात प्रत्येक वर्षी बालिका दिन साजरा केला जावू लागला. देशातील मुलगा-मुलगी हा भेद संपावा हा यामागील उद्देश होता. तसंच सेक्स रेश्यो सुधारण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षितेतसाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय बालिका दिनाच्या आजच्या महत्त्वपूर्ण दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Images, Greetings तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम यावरुन शेअर करुन राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हे अभियान 2015 मध्ये लॉन्च झाले. या अभियानाद्वारे मुली, महिलांच्या अनेक समस्या समोर आल्या, मुलींसंदर्भात समाजाचा असलेला दृष्टीकोन अद्याप बदललेला नाही. अजूनही स्त्रीभृण हत्या ही समस्या भारतीय समाजात कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेला हा समज पुसून टाकण्यासाठी या अभियानाची मदत झाली. दरम्यान, आता मुलींच्या शिक्षण, आरोग्याबद्दल समाज जागृक आहे. मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलत आहे.
राष्ट्रीय बालिका दिन 2021 शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही तुम्ही बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जा आणि तेथून बालिका दिनाचे व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करुन सर्वांना पाठवा, स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
बालिका दिनानिमित्त देशभरात महिलांची सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आदी संदर्भात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या सर्व गोष्टींमुळे मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे दिसून येत आहे आणि हेच खरे बालिका दिनाचे श्रेय आहे.