Namibia National Cricket Team vs United States National Cricket Team 3rd T20 2024 Tri-Series Live Streaming: नामिबिया विरुद्ध युनायटेड स्टेट्स(Namibia vs United States ) संघ यांच्यात टी 20 तिरंगी मालिका सध्या सुरू आहे. तिसरा सामना आज म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर (Wanderers Stadium) उभय संघांमध्ये हा सामना होणार आहे. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात युनायटेड स्टेट्सने नामिबियाचा 40 धावांनी पराभव केला होत. तर दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने युनायटेड स्टेट्सवर 15 धावांनी विजय मिळवला. आता तिसऱ्या सामन्यात नामिबिया आणि अमेरिका आमनेसामने आहेत. अमेरिकेला पराभूत करून 2-1 असा विजय मिळवण्याकडे नामिबियाचे लक्ष असेल. दुसरीकडे, अमेरिकेच्या संघालाही नामिबियाला हरवून मालिका आपल्या नावावर करण्याचे लक्ष असले. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा:IND vs BAN T20 Schedule: भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून टी 20 मालिका; कुठे, कधी होणार सामने? पहा वेळापत्रक)
नामिबिया विरुद्ध युनायटेड स्टेट्स यांच्यातील तिरंगी मालिकेतील तिसरा सामना किती वाजता सुरू होणार?
नामिबिया विरुद्ध संयुक्त अरब अमेरिका यांच्यातील तिसरा टी 20 सामना आज म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ सामन्याच्या अर्धा तास आधी असेल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
आम्ही तुम्हाला सांगतो की नामिबिया T20 ट्राय-सीरीज 2024 चे लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना तिसरा सामना येथून पाहता येईल. तथापि, आगामी तिरंगी मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित होणार नाही.
दोन्ही संघांचे खेळाडू
नामिबिया संघ: जेपी कोट्झे (विकेटकीपर), जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, जॅन डीव्हिलियर्स, मालन क्रुगर, डिलन लीचर, बर्नार्ड शॉल्ट्झ, जॅक ब्रासेल, टांगेनी लुंगामेनी, शॉन फौचे, बेन शिकोंगो, अलेक्झांडर वोलोशेंक, पीटर-डॅनियल ब्लिग्नॉट, जॅन बाल्ट, झेन ग्रीन
युनायटेड स्टेट्स संघ: सैतेजा मुक्कामल्ला, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), स्मित पटेल, नितीश कुमार, शायन जहांगीर, हरमीत सिंग, जसदीप सिंग (क), नोस्तुश केंजिगे, अभिषेक पराडकर, अयान देसाई, जुआनोय ड्रायस्डेल, उत्कर्ष श्रीवास्तव, यासिर मोहम्मद, मोनांक पटेल, मिलिंद कुमार