Mzansi Super League 2019: तबरेज शम्सी याने मॅचदरम्यान जादूचा असा खेळ करत सर्वांना केले आश्चर्यचकित, पाहा हा थक्क करणारा Video
तबरेज शम्सी (Photo Credit: Twitter/MSL_T20)

मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) सध्या जोमाने सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या टी-20 लीगने यापूर्वी क्रिकेट प्रेमींचे भरपूर मनोरंजन केले आहे. एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन, अ‍ॅलेक्स हेल्स, फाफ डू प्लेसिस यांच्यासारख्या काही क्रिकेटमध्ये दमछाक करणार्‍या काही प्रदर्शनांनी चाहत्यांची मनं जिंकली, आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय दर्जेचा गोलंदाज तबरेझ शम्सी (Tabraiz Shamsi) याने आपल्या जादूच्या खेळीने मैदानावर उपस्थित आणि सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधले. शम्सीने पर्ल रॉक्स साठी विकेट घेतल्यावर एका मॅजिकल ट्रिकने सर्वांना थक्क केले. बूट-कॉल सेलिब्रेशन व्हायरल झालेल्या शम्सीने आता आपल्या जादूने चाहत्यांना चकित केले. बुधवारी पार्ल रॉक्स आणि डर्बन हीट यांच्यात झालेल्या मॅझन्सी सुपर लीग 2019 सामन्यात शम्सीने एक विकेट घेण्याचा आनंद धमाकेदार पद्धतीने साजरा केला ज्याला पाहून खुद्द भाष्यकर्तेही चक्रावून गेले. (Mzansi Super League 2019: डेल स्टेन याने एबी डिव्हिलियर्स याला मजेशीरपणे केले रन-आऊट, पाहून तुम्हालाही येईल हसू, पाहा व्हिडिओ)

सामन्याच्या आठव्या षटकात शम्सीने विहान लुब्बे (Wihan Lubbe) याला गोलंदाजी केली. शम्सीचा पहिला चेंडू लुब्बेने चौकारासाठी मारला. पण, नंतर लुब्बेने शम्सीच्या पुढील चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू जास्त लांब गेला नाही आणि हार्डस विल्जोन यानें आरामदायक कॅच पकडतलुब्बेला माघारी पाठवले. विकेटने उत्सुक असलेल्या शम्सीने खिशातून लाल रुमाल काढला आणि त्याला काठीत बदलला. पाहा शम्सीचा हा थक्क करणारा व्हिडिओ:

शम्सी नेहमीच जादू आणि वेगवेगळ्या युक्तींनी मोहित झाला होता आणि 15-16 वयाच्या पासून जादूगार बनू इच्छित होता, पण, क्रिकेटवरील त्याच्या प्रेमामुळे त्याने त्याचा हा छंद मागे टाकत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करण्यास जास्त भर दिला.

यापूर्वीच्या सामन्यातही शम्सीने अशीच मॅजिकल ट्रिकचे प्रदर्शन केले होते, त्यानंतर त्याने जादूबद्दलचे त्याला आकर्षण असल्याचे स्पष्ट केले होते. "मला नेहमीच जादू आणि वेगवेगळ्या युक्त्यानी आकर्षित केले आहे," शम्सी म्हणाला. "वयाच्या 15 किंवा 16 वर्षापासून मला जादूगार व्हायचे होते कारण ते माझे एक छंद होते. हा फक्त एक टप्पा नव्हता, परंतु एक लहान म्हणून मला खरोखर आवडणारी अशी गोष्ट होती. मला अजूनही ते आवडते, पण त्यानंतर क्रिकेटने प्रथम प्राधान्य घेतले."

"मैदानावर मनोरंजन करणे म्हणजे स्वतःवरील दबाव कमी करणे आणि गोष्टींचा आनंद घेणे हीच माझी एक पद्धत आहे."