फाफ डु प्लेसिस, हार्डस विल्जोन (Photo Credit: Getty Images)

दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessi) याने मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) मधील एका वक्तव्याने सर्वांनाच चकित केले. लीगमधील रविवारच्या सामन्यादरम्यान पार्ले रॉक्सचा (Paarl Rocks) कर्णधार म्हणून डु प्लेसिस टॉससाठी मैदानात उतरला होता. रविवारी बोलैंड पार्कमधील नेल्सन मंडेला बे जायंट्स(Nelson Mandela Bay Giants) विरुद्ध सामन्यात टॉसदरम्यान डु प्लेसिसला जेव्हा संघातील बदलांविषयी विचारले गेले तेव्हा त्याने आपल्या वक्तव्याने सर्वांना चकित केले. तथापि, नंतर त्या गोषीतचे रूपांतर विनोदात झाले. पर्ल रॉक्सची टीम फाफ डू प्लेसिस आणि हार्डस विल्जोन (Hardus Viljoen) सोबत खेळत आहे. सहकारी खेळाडू असण्याव्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंचे वेगळे नाते आहे. ज्यामुळे त्याने आज एक विचित्र विधान केले आहे. विल्जोनचे डु प्लेसिसची बहीण रेमी डू प्लेसिसशी लग्न झाले आहे. ज्यामुळे तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. याबद्दल जेव्हा फाफला विचारले तेव्हा त्याचे स्पष्टीकरण ऐकून भाष्यकारालाही त्याचे हसू अनावर झाले.

डू प्लेसिसने टॉस गमावल्यावर सांगितले की विल्जोन आजचा सामना खेळत नाही आहे कारण काल त्याने माझ्या बहिणीशी लग्न केले होते आणि ते दोघेही एकत्र झोपले आहेत. डू प्लेसिसचे हे विधान ऐकून सर्वांनाच धक्का बसला आणि प्रश्न विचारणारा टीकाकार हसू लागला. डुप्लेसिसचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा इथे:

दक्षिण आफ्रिकेकडून आजवर विल्जोनने केवळ एका कसोटी सामना खेळला आहे. 30 वर्षीय याने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या लीगमध्ये डुप्लेसीस मागील सामन्यात फलंदाजीमध्ये अपयशी ठरला. त्याने 22 धावांची खेळी केली. भारताविरुद्ध कसोटी मालिकेत खराब पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आता इंग्लंडविरूद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची तयारी करीत आहे.डुप्लेसीस संघाचे नेतृत करेल, तर मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरला सुरु होईल.