हृदयाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर Muttiah Muralitharan यांना लवकरच रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
Muttiah Muralitharan (Photo Credit: Twitter)

सनरायजर्स हैदराबाद संघाचा (Sunrisers Hyderabad) गोलंदाजी प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) यांना लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुथय्या मुरलीधरन हृदयाशी संबंधित विकारावर उपचार करुन घेण्यासाठी रविवारी (18 एप्रिल) चेन्नईच्या (Chennai) अपोलो रुग्णालयामध्ये (Apollo Hospital) दाखल झाले आहेत. त्याच्यावर रविवारी यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. अपोलो रुग्णालयाने आज (19 एप्रिल) जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

मुथय्या मुरलीधरन यांना हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी 18 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर रविवारी यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच त्याची प्रकृती आता स्थिर आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असून ते आपले नॉर्मल रुटीन सुरु करू शकतात, असे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. हे देखील वाचा- Sunrisers Hyderabad: आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सनराईजर्झ हैदराबादची खराब कामगिरी; व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले अपयशाचे कारण

मुरलीधरन हे 49 वर्षांचे आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फिरकीपटू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी श्रीलंकेसाठी एकूण 133 कसोटी सामने खेळले आहेत. तर, 350 एकदिवसीय खेळले आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी विकेट्स पटकावल्या आहेत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 534 विकेट्स मिळवले आहे. त्यांनी एकदिवसीय विश्वचषक 2011 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली.

तसेच ते काही काळ आयपीएलमध्ये खेळले आहेत. दरम्यान, मुरलीधर यांनी गोलंदाज म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी आयपीएलमध्ये एकूण 66 सामने खेळले आहेत. ज्यात 63 विकेट मिळवल्या आहेत. आयपीएलमध्ये 11 धावा देत 3 विकेट ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. सध्या ते सनरायझर्स हैदराबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.