मुंबईत रणजी ट्रॉफीची फायनल सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी मुंबईकर फलंदाजांनी सुरुवातीला चांगला खेळ केल्यानंतर मात्र खराब कामगिरी करत बेजबादारपणे आपले विकेट गमावले. मुंबईचा पहिला डाव आज 224 धावांवर सर्वबाद झाले आहे. मुंबई फलंदाजांनी केलेल्या बेजबाबदार फलंदाजीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरांनी नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांने मुंबईच्या फलंदाजावर जोरदार टिका केली असून यावेळी सचिनने विदर्भच्या गोलंदाजांचे कौतृक देखील केले आहे. (हेही वाचा - Ranji Trophy 2023-24: विदर्भ रणजी करंडक अंतिम फेरीसाठी पात्र, उपांत्य फेरीत मध्य प्रदेशचा 62 धावांनी केला पराभव)

पाहा पोस्ट -

सचिनने एक्सवर पोस्ट केले आणि त्यात मुंबई फलंदाजांवर भाष्य करताना विदर्भच्या गोलंदाजीचेही कौतूक केले. मुंबईच्या फलंदाजांनी अतिशय सामान्य अशी फलंदाजी केली त्याच वेळी विदर्भच्या गोलंदाजांनी चांगले क्रिकेट खेळून मुंबईच्या फलंदाजांवर दडपण ठेवले. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर हिरवे गवत दिसत आहे, परंतु खेळ जा पुढे जाईल तसे चेंडू फिरक घेऊ लागतील. मुंबईच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर विदर्भने उत्तम गोलंदाजीकरून सामन्यावर पकड मिळवली. पहिले सत्र विदर्भाचे असेही सचिनने म्हटले आहे.

पृथ्वी शॉ आणि भुपेन लालवानी यांच्या 81 धावांच्या सलामीनंतर मुंबईची 6 बाद 111 अशी दारुण अवस्था झाली होती. यात अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी बेजबाबदार फटके मारुन बाद झाले. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट बाद केले. तर मुंबईकडून शार्दुल ठाकुरने 69 चेंडूत 75 धावांची स्फोटक खेळी केली. विदर्भाच्या डावाची सुरुवात देखील खराब झाली असून धवल कुलकर्णी आणि शार्दुल ठाकुरने  सुरवातीलाच विदर्भाला धक्के दिले. सध्या त्यांची धावसंख्या 31 वर 3 बाद अशी आहे.