2019 मध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांना डोमेस्टिक सर्किटमध्ये काही आकर्षक फायनल्स पाहायला मिळाले. आयपीएल (IPL) 2019 मध्ये हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात झालेला सामना सर्वात जास्त चर्चेत राहिला. पण, अखेरीस मुंबई संघाने शांत चित्ताने सामना खेळत 1 धावानी विजय मिळवला. रविवारी अशाच प्रकारची अंतिम फायनल पाहायला मिळाली पण यावेळी सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडकाच्या 2019-20 आवृत्तीत. कर्नाटक आणि तामिळनाडू संघातील थरारक अंतिम सामन्यात कर्नाटकने 1 रनने विजय मिळवला. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) ट्विटरवरुन एक सर्वेक्षण करून नेटिझन्सना यंदाच्या दोन फायनल्समध्ये सर्वोत्तम सामना निवडण्यास सांगितले. केकेआरने ट्विटरवर जाऊन लिहिले की, “2019 मध्ये दोन अविश्वसनीय टी-20 अंतिम थरारक सामन्याचे साक्षीदार झाले आणि #केकेआरडमिन हे जाणून घेऊ इच्छित आहे की आपला कोणता आवडता होता.” केकेआरच्या या ट्विटने मुंबई इंडियन्सना त्यांना ट्रोल करण्याची संधी दिली. (IPL 2020 Auction: 971 खेळाडूंचा होणार लिलाव, अनेक खेळाडूंची बेस प्राईज जाहीर, घ्या जाणून)
या ट्विटमध्ये एमआय विरुद्ध सीएसके, आयपीएल फायनल आणि कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनल संदर्भात नेटिझन्सकडून मत मागितले गेले होते. आणि स्पष्टपणे, केकेआरच्या या पोस्टवर 79 टक्के मत मुंबई विरुद्ध चेन्नई, आयपीएल फायनलच्या बाजूने होते. केकेआरच्या या पोस्टबद्दल मुंबई इंडियन्सने त्यांची फिरकी घेण्यास संकोच केला नाही. केकेआरने त्यांच्या ट्विटमध्ये मुंबई विरुद्ध चेन्नई, आयपीएल फायनलचा उल्लेख करण्यासाठी आयपीएल ट्रॉफीचा फोटो घातला. मुंबई इंडियन्सनी केकेआरला आयपीएल ट्रॉफी ऐवजी संघाने ट्रॉफी जिंकणारा फोटो वापरायला सांगितले. मुंबईने अधिकृत ईमेलच्या स्वरूपात ही पोस्ट शेअर केली. चार वेळा आयपीएल चॅम्पियन्सने ट्विटरवर लिहिले की, “IPL2019_Champions.jpg हॅलो केकेआर ऍडमीन, कृपया, संलग्न केलेला फोटो मोकळ्या मानाने वापर. विनम्र, # एमआयएडमिन.” कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील या ट्विट वॉरचा क्रिकेटपटूंनी आनंद लुटला.
2⃣0⃣1⃣9⃣ witnessed two incredible T20 final thrillers and the #KKRAdmin wants to know which one was your favourite. 🤔#KKR
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 2, 2019
मुंबई इंडियन्सची प्रतिक्रिया
To: @KKRiders
📎 IPL2019_Champions.jpg
Hello KKR Admin,
Please feel free to use the attached image.
Regards,#MIAdmin pic.twitter.com/potZujP0d3
— Mumbai Indians (@mipaltan) December 2, 2019
केकेआरचा प्रतिसाद
Right Click - Save As - IPL2019_Champions
Appreciate the image @MiPaltan! 🙌
It's been a roller-coaster 2019 and the #KKRAdmin hopes to see more thrillers in 2020! 😁🏏
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 2, 2019
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 12 व्या मोसमात कोलकाता येथे 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यंदा एकूण 971 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. आयपीएल 2020 च्या लिलावापूर्वी फ्रँचायझींनी काही खेळाडूंना रिलीज केले होते तर काहींना कायम ठेवले होते. यंदा झालेल्या आयपीएल फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद जिंकले.