Kieron Pollard: असं कोण खेळता का? कीरॉन पोलार्डनं मारलेल्या आगळ्या-वेगळ्या शॉटची सोशल मीडियावर चर्चा; व्हिडिओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल
कीरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

वेस्ट इंडिजचा संघ लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मैदानात घाम गाळायला सुरुवात केली आहे. याचदरम्यान, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) वेस्ट इंडिजचा खेळाडू कीरॉन पोलार्डचा (Kieron Pollard) सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल केला आहे. या व्हिडिओत कीरॉन पोलार्ड जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहे. परंतु, सराव सत्राच्या शेवटच्या बॉलवर त्याने मारलेल्या आगळ्या-वेगळ्या शॉटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने शेवटच्या बॉलला चक्क स्टम्पच्या मागे जाऊन जोरदार फटका मारला आहे. पोलार्डचा हा अनोखा शॉट पाहून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकीत झाले आहेत.

कीरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये गेल्या अनेक हंगामापासून मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. एवढेच नव्हेतर, मुंबई इंडियन्सचे कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करताना दिसला आहे. पोलार्डने आतापर्यंत 171 सामने खेळून 154 डावात 30.7 च्या सरासरीने 3191 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 16 अर्धशतके आहेत. या काळात त्याच्या फलंदाजीमधून 211 षटकार आणि 207 चौकार ठोकले आहेत. हे देखील वाचा- Vamika ची झलक दाखवण्याची मागणी करणाऱ्या चाहत्याला Virat Kohli ने दिले 'हे' उत्तर

मुंबई इंडियन्सचे ट्वीट-

पोलार्डच्या आतंराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने वेस्ट इंडिजच्या संघाकडून 116 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 106 डावात 26.4 च्या सरासरीने 2 हजार 564 धावा केल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत त्याच्या नावावर 3 शतके आणि 11 अर्धशतके आहे. याशिवाय, टी-20 क्रिकेटमधील 79 सामन्यातील 65 डावात 24.6 च्या सरासरीने 1 हजार 277 धावा ठोकल्या आहेत. पोलार्डला उत्कृष्ट गोलंदाज म्हणूनही ओळखले जाते. त्याने एकदिवसीय सामन्यातील 79 डावात 54 विकेट्स घेतले आहेत. तर, टी-20 क्रिकेटच्या 79 सामन्यातील 51 डावात 37 विकेट्स पटकावले आहेत.