एमएस धोनी याच्या स्मार्टनेसमुळे पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाने 2007 टी-20 च्या रंगतदार सामन्यात बॉल आउटने मिळवला विजय, पाहा Video
भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Getty)

आयसीसीच्या तीन मुख्य ट्रॉफी जिंकणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) , हा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पिअनस ट्रॉफीचं विजेतेपद पटकावले आहे. त्याला 2007 मध्ये भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. कर्णधार बनल्यावर त्याची सर्वात मोठी परीक्षा होती ती म्हणजे पहिला टी-20 वर्ल्ड कप (World Cup). दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजित या वर्ल्ड कप सामन्यात भारताने (India) दोन वेळा पाकिस्तानला (Pakistan) धूळ चारली. दोन्ही देशात डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला बॉल आउटमध्ये (Ball-Out) 3-0 ने हरवून सामना जिंकला. ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांनी 141 धावा केल्या आणि सामना टाय झाला, त्यामुळे बॉल-आऊटने विजेत्याची निवड करण्यात आली. पाकिस्तानविरुद्ध भारताला मिळालेल्या विजयाचे श्रेय धोनीच्या स्मार्ट निर्णयाला जाते. पाकिस्तानची बॉलआउटसाठी चांगली तयारी नव्हती, परंतु गरज भासल्यास बॉल-आऊटला कसे सामोरे जावे यासाठी टीम इंडियाने आधीपासूनच योजना आखली होती. (CSK ने शेअर केला 'थाला' एमएस धोनीचा नवीन व्हिडिओ, 'आया शेर आया शेर' म्हणत Netizens ने केले स्वागत)

धोनीने टीममधील पार्ट टाइम गोलंदाज- वीरेंद्र सहवाग, रॉबिन उथप्पा, नियमित गोलंदाज- श्रीशांत, इरफान पठाण  हरभजन सिंह यांना निवडले. सहवाग, उथप्पा आणि भज्जीने सलग तीन चेंडूवर स्टंप आऊट केले, तर पाकिस्तानला एकही यश मिळाले नाही. अशा प्रकारे भारताने पुन्हा एका वर्ल्ड कप सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानकडून उमर गुल, सोहेल तनवीर, अराफात, शाहिद आफ्रिदी आणि आसिफ यांना निवडले होते. भारताकडून धोनीने विकेटकिपिंग सांभाळली. धोनीच्या या स्मार्ट पाऊलमुळे गोलंदाजांना स्टंप्स हिट करण्यास मदत झाली. गोलंदाजांना चेंडू फक्त धोनीकडे टाकायचा होता. ही एकमेव घटना आहे जिथे क्रिकेट सामन्याचा निकाल बॉल-आऊटद्वारे लावण्यात आला. आता बॉल-आऊटच्या जागी सुपर-ओव्हरने निर्णय लावला जातो.

पाहा 'त्या' रंगतदार सामन्यात भारताने कसा मिळवला विजय:

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नेतृत्वात हा भारताचा पहिला विजय होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला, तरीही सामनावीर म्हणून पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आसिफला चार विकेट घेतल्यामुळे देण्यात आले. दुसरीकडे, सामन्यात भारताकडून उथप्पाने 40 चेंडूंत 50 धावा फटकावल्या ज्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.