एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा सहकारी असण्याव्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings)) खेळताना एकत्रित बराच वेळ घालवला आहे. सीएसकेकडून (CSK) खेळताना रैनाने धोनीच्या नेतृत्वात आपल्या कौशल्य वाढवले आणि तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला. म्हणून शनिवारी सायंकाळी धोनीने निवृत्तीची घोषणा केली तेव्हा रैनाने त्याच्या पावलावर पाऊल टाकले आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं. रैनाने आपल्या सीएसके संघातील साथीदारांसह इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि धोनीसोबत निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीच्या वेळेबद्दल कोणालाही कल्पना नव्हती, परंतु रैनाने आता चेन्नईमध्ये आगमन झाल्यानंतर माजी भारतीय कर्णधार या निर्णयाची घोषणा करेल ते त्याला माहित असल्याचा खुलासा केला. (Suresh Raina Retires: वयाच्या 16व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर आजही आहेत 'हे' विक्रम, पाहा चिन्ना थालाच्या कारकिर्दीतील जबरदस्त रेकॉर्ड)
“मला माहित होतं की चेन्नईला पोचल्यावर धोनी निवृत्तीची घोषणा करेल, म्हणून मी तयार होतो. मी, पियुष चावला, दीपक चाहर आणि कर्ण शर्मा 14 तारखेला चार्टर्ड विमानासह रांचीला पोहोचलो आणि माही भाई आणि मोनू सिंह यांना पीक केले, ”रैनाने दैनिक जागरणला सांगितले. “आम्ही निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आम्ही मिठी मारली आणि खूप रडलो. त्यानंतर मी, पीयूष, अंबाती रायुडू, केदार जाधव आणि कर्ण एकत्र बसलो, आमच्या करियरविषयी आणि आमच्या नात्याबद्दल बोललो. आम्ही रात्रभर पार्टी केली,” रैनाने पुढे सांगितले. 15 ऑगस्ट रोजीच निवृत्ती का घेतली, याचं उत्तरही रैनाने दिलं. रैना म्हणाला की, ‘‘आम्ही दोघांनी आधीपासूनच शनिवारी निवृत्ती घेण्याचं ठरवलं होतं. धोनीच्या जर्सी क्रमांक 7 आहे आणि माझ्या जर्सीचा क्रमांक 3 आहे, दोन्ही मिळून 73 होतात. शनिवारी भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिवस होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी या दिवसाची निवड केली,’’ असं म्हणत रैनाने सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
Two roads converged on a #yellove wood... #Thala #ChinnaThala #73Forever 🦁🦁 pic.twitter.com/0BDe99kp0z
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 16, 2020
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्राच्या तयारीसाठी धोनी आणि रैना फ्रँचायझी संघ चेन्नई सुपर किंग्जबरोबर सराव करत आहेत. दुसर्याच दिवशी टीम इंडियाच्या या दोन शिलेदारांच्या निवृत्तीची बातमी समोर आल्यानंतर सीएसकेने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि यशस्वी करिअर संपल्यानंतर संघातील खेळाडूंची प्रतिक्रिया काय होती हे दाखवले.