MS Dhoni याचा कन्या Ziva सोबत नवीन लूक पाहिलात का? पाहा फोटोज व Videos
एमएस धोनी आणि कन्या झिवा (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा धोनीने  (Ziva Dhoni) सोमवारी तिचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटूचा न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. सज्जनांच्या खेळाच्या इतिहासातील सर्वांत सुशोभित क्रिकेटपटूंपैकी, धोनी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या युएई (UAE) लेगच्या सुरुवातीपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत मौल्यवान वेळेचा आनंद लुटत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) फ्रँचायझीचा दिग्गज क्रिकेटपटू आणि कर्णधार यापूर्वी आयपीएल 2021 च्या स्थगितीनंतर आपल्या मूळ गावी, रांचीला परतला होता. आणि आता हिमाचल प्रदेश सरकारने कोविड-19 मानदंडात सवलत जाहीर केल्याच्या काही दिवसानंतर धोनी कुटुंबाने लोकीच्या सुट्टीनिमित्त शिमला येथे वेळ घालवण्याचे ठरवलेले दिसत आहे.

सोमवारी धोनीची मुलगी झिवाने आपल्या कुटूंबाच्या नुकत्याच झालेल्या राणी ऑफ हिल्सच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. झिवाचे इन्स्टाग्रामवर स्वत: चे अधिकृत खाते आहे जे धोनी आणि त्याची पत्नी साक्षी व्यवस्थापित करतात. कौटुंबिक सुट्टीवर असलेल्या धोनीचा एक नवा लूक चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल झाला असून झीवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. दरम्यान, धोनीने आपल्या ऑफिशियल अकाउंटवर अधिक सक्रिय नसला तरी, CSK लिजेंडचे नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल झालेला पाहायला मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

अलीकडेच, धोनी कुटुंबीयांचे शिमल्यातील सुट्टीचा आनंद घेत असलेले अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

शिवाय धोनीची पत्नी साक्षीने देखील नुकतंच शिमला येथील त्यांच्या नवीन घराची झलक दाखवली होती. साक्षीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर जिथे धोनी आणि कुटुंब ज्याठिकाणी जिथे राहत आहे ती मन मोहणाऱ्या घराची झलक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

दुसरीकडे, मे महिन्यात आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळताना दिसेल. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले जाऊ शकते.