भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून निळ्या रंगाची टिक (Blue Tick) काढून टाकण्यात आली होती. सांगितले जात आहे की त्याने बराच काळ त्याचे ट्विटर खाते वापरले नाही, त्यामुळेच त्याच्या ट्विटर खात्यावरून निळी टिक काढून टाकण्यात आली. धोनीचे ट्विटरवर सुमारे 8.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. धोनीने शेवटचे ट्विट 8 जानेवारी 2021 रोजी केले होते. तो 2018 पासून ट्विटरवर खूप कमी ट्विट करत आहे. मात्र आता अगदी काही तासांमध्येच महेंद्रसिंग धोनीला ट्विटरवर त्याची निळी टिक परत मिळाली आहे.
आतापर्यंत या प्रकरणी ट्विटरकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. महेंद्रसिंग धोनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक काढून टाकल्याबद्दल चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत चाहत्यांनी ट्विट करत ट्वीटरची निंदा केली होती. अखेर ट्वीटरला धोनीची ब्ल्यू टिक परत करावी लागली.
धोनीचे ट्विटरवर सुमारे 8.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंडच्या हातून झालेल्या उपांत्य फेरीच्या पराभवापासून धोनी क्रिकेटपासून दूर होता. त्याने त्यावेळी घरचे सामनेही खेळले नाही आणि तो सैन्याबरोबर प्रशिक्षणासाठी गेला. तो आयपीएल 2020 मध्ये खेळताना दिसला होता, पण त्याआधी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने फक्त चार ट्विट केले होते. धोनीने 2019 मध्ये एकूण सात ट्वीट केले होते. यापूर्वी, 2018 पर्यंत तो ट्विटरवर खूप सक्रिय होता. 2018 मध्ये त्याने 20 हून अधिक ट्वीट केले आहेत. 2019 च्या विश्वचषकापासून धोनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही कमी सक्रिय आहे. ट्वीटरच्या नियमानुसार, जर एखादे खाते बर्याच काळापासून सक्रिय नसेल तर त्याची निळी टिक कोणत्याही सूचनेशिवाय काढली जाऊ शकते. (हेही वाचा: अनिल कुंबळेंचा रेकॉर्ड तुटणार ? हा खेळाडू ठरणार जगातील सर्वोकृष्ट तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज)
कदाचित म्हणूनच धोनीची ब्ल्यू टिक काढली गेली असावी, मात्र चाहत्यांच्या नाराजीनंतर ती परत मिळाली आहे.